Home /News /sport /

IND vs AUS : कोरोना संकटात रहाणेने अशी केली ऑस़्ट्रेलिया दौऱ्याची तयारी

IND vs AUS : कोरोना संकटात रहाणेने अशी केली ऑस़्ट्रेलिया दौऱ्याची तयारी

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात टीम इंडियाने बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) पराभव केला. पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाच्या रजेवर गेला, त्यामुळे रहाणेला टीम इंडियाचं नेतृत्व मिळालं.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 31 डिसेंबर : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात टीम इंडियाने बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) पराभव केला. पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाच्या रजेवर गेला, त्यामुळे रहाणेला टीम इंडियाचं नेतृत्व मिळालं. ही जबाबदारी त्याने अत्यंत चोखपणे पार पाडली. पहिल्या इनिंगमध्ये रहाणेने 112 रनची खेळी करत भारताला मोठी आघाडी मिळवण्यासाठी मदत केली, ज्यामुळे ऑस्ट्रलियावर दबाव वाढला. रहाणेचे बराच काळ प्रशिक्षक राहिलेले प्रविण आमरे (Pravin Amre) यांनीही त्याच्या या खेळीचं आणि नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. 'मी फक्त रहाणे या बॅट्समनसोबत काम केलं, नेतृत्व करण्याची क्षमता आधीपासूनच त्याच्यात होती. नेतृत्वाचं सगळं श्रेय त्याचं आहे, कारण तो नेहमीच वेगवेगळ्या रणनीती घेऊन तयार असतो. तो पहिल्या क्रमांकापासून ते सहाव्या क्रमांकावर कुठेही बॅटिंग करू शकतो. त्याच्यासाठी नेहमीच टीम पहिले येते,' असं प्रविण आमरे टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले. 'अजिंक्यने दोन नव्या खेळाडूंचं समर्थन केलं. शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजला खेळवणं मोठा निर्णय होता. आयपीएलसाठी युएईला रवाना व्हायच्या आधी कोरोना काळात रहाणेने मुंबईत लाल बॉलने मेहनत केली होती. ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी रहाणने रोज दोन-दोन तास सराव केला होता,' असं प्रविण आमरे यांनी सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या