VIDEO: जगातल्या नंबर 1 च्या बॅट्समनला चकवलं; पाहा अश्विनने हा खास बॉल टाकत कशी काढली विकेट

VIDEO: जगातल्या नंबर 1 च्या बॅट्समनला चकवलं; पाहा अश्विनने हा खास बॉल टाकत कशी काढली विकेट

IND Vs Aus : जगातला सध्याचा टॉप बॅट्समन असलेला स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा खेळाडू. तो स्वस्तात माघारी परतला कारण ठरला हा बॉल, पाहा VIDEO

  • Share this:

अ‍ॅडलेड, 18 डिसेंबर : इंडिया आणि ऑस्ट्रेलिया( India vs Australia ) यांच्या क्रिकेट कसोटीला(Test Series) गुरुवारी सुरुवात झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये इंडियन टीमला बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करण्यास अपयश आलं असून इंडियन टीम अवघ्या 244 रनमध्ये ऑलआउट झाली आहे. पहिल्याच दिवशी टीम इंडियाने महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच इंडियाचे चारही बॅट्समन लवकर आउट झाले. परंतु इंडियन बॉलर्सनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली असून ऑस्ट्रलियान बॅट्समनला देखील जेरीस आणले होते. ऑस्ट्रेलियाची टीमदेखील पहिल्या इनिंगमध्ये ऑलआउट झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनने(Tim Paine) सर्वाधिक रन केल्या असून इतर बॅट्समन रन बनवण्यासाठी धडपडत होते.

महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगमध्ये त्यांचा भरवशाचा बॅट्समन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) हा स्वस्तात माघारी परतला. त्याला स्पिनर आर अश्विनने(R.Ashwin) आउट केलं. स्मिथला 29 बॉलमध्ये अवघी 1 रन काढता आली. पण यामागे देखील इंडियन वेगवान बॉलरचे योगदान आहे. या मॅचमध्ये सुरुवातीपासूनच स्मिथ दबावात दिसत होता. जसप्रीत बुमरा(jasprit bumrah) आणि मोहम्मद शमी(mohammad shami) यांनी स्मिथला रन करून दिल्या नाहीत. त्यामुळं तो दबावात आला. यानंतर कॅप्टन कोहलीने अश्विनला बॉलिंग दिली. सुरुवातीला स्मिथ आरामात खेळात होता. पण नंतर अश्विननं त्याला आपल्या जाळ्यात ओढलं. अश्विननं खास ड्रिफ्ट बॉल टाकत स्मिथ याला चकवा दिला. त्यामुळं उत्तम स्पिन खेळू शकणारा स्मिथ देखील आउट झाला. पहिल्या स्लिपमध्ये अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) याने त्याचा शानदार कॅच पकडला. इंडियन बॉलर्सच्या जबरदस्त कामगिरीवरच ऑस्ट्रेलियाला ऑलआउट करणं शक्य झालं. 191 रनमध्ये ऑस्ट्रेलिया आउट झाली.

सिक्सर किंग युवराजचं क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन, दुबईतल्या या स्पर्धेत खेळणार

स्मिथची विकेट महत्त्वाची का ?

स्मिथ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये(Icc Test Ranking) पहिल्या नंबरवर आहे. टेस्ट क्रिकेटमधील(test) सध्याचा तो सर्वोत्तम प्लेअर आहे. त्यामुळे त्याची विकेट खूपच महत्त्वाची आहे. त्याने आतापर्यंत भारताविरुद्ध 8 टेस्ट मॅचमध्ये 7 शतकं केली आहेत. इंडियन टीमविरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच चांगली होते. 21 टेस्ट इनिंगनंतर तो 5 पेक्षा कमी रनवर आउट झाला आहे. त्याचबरोबर अश्विनने देखील त्याला 2016 नंतर पहिल्यांदा तो 2 रनपेक्षा कमी रन करून आउट झाला आहे. त्यामुळं आजच्या या मॅचमध्ये अश्विनने मिळवलेली विकेट इंडियन टीमसाठी खूप महत्त्वाची होती.

First published: December 18, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या