Home /News /sport /

IND vs AUS : ऍडलेडमधली पहिली टेस्ट या भारतीय खेळाडूसाठी अखेरची ठरली?

IND vs AUS : ऍडलेडमधली पहिली टेस्ट या भारतीय खेळाडूसाठी अखेरची ठरली?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला (India vs Australia) शनिवार 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचसाठी भारताने टीममध्ये तब्बल 4 बदल केले आहेत. यानंतर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याच्यासाठी मागची टेस्ट मॅच अखेरची ठरली का? असे प्रश्नही उपस्थित झाले.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 25 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला (India vs Australia) शनिवार 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचसाठी भारताने टीममध्ये तब्बल 4 बदल केले आहेत. पृथ्वी शॉ (Prithivi Shaw), ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांना बाहेर बसवण्यात आलं आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाच्या रजेवर गेला आहे आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) दुखापतीमुळे उरलेल्या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताने शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा दारूण पराभव झाला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव फक्त 36 रनवर संपुष्टात आला. टेस्ट क्रिकेटमधली भारताची ही निचांकी धावसंख्या होती. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समननी खेळलेल्या काही शॉट्सवर टीकाही करण्यात आली. पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा या दोघांनी खेळलेल्या शॉट्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ऋद्धीमान साहा याच्यासाठी ही टेस्ट मॅच अखेरची ठरली का? असे प्रश्नही उपस्थित झाले. ऋद्धीमान साहा या त्याच्या बॅटिंगपेक्षा उत्कृष्ट विकेट कीपिंगसाठी ओळखला जातो, पण पहिल्या टेस्टमध्ये त्याची कीपिंगही फारशी चांगली झाली नाही. ऋद्धीमान साहा हा सध्या 36 वर्षांचा असून पुढच्या वर्षी तो 37 वर्षांचा पूर्ण होईल. 2021 या वर्षात सुरुवातीलाच इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येईल. या दौऱ्यात 4 टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहेत. इंग्लडविरुद्धच्या सीरिजनंतर भारत फार टेस्ट क्रिकेट खेळणार नाही. हा दौरा संपल्यानंतर आयपीएलला सुरुवात होईल. तसंच आयपीएलनंतर आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताची टीम पोहोचली तर त्यांना एक मॅच खेळायला मिळेल. भविष्यातलं कमी टेस्ट क्रिकेट, ऋद्धीमान साहा याचं वय आणि त्यातच आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) याने चांगली कामगिरी केली, तर मात्र ऋद्धीमान साहा याला संधी मिळणं कठीण होऊन बसेल. ऋद्धीमान साहा याचं रेकॉर्ड ऋद्धीमान साहा याने 38 टेस्ट मॅचमध्ये 29.09 च्या सरासरीने 1,251 रन केले. यामध्ये तीन शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्टमधला साहा याचा सर्वाधिक स्कोअर 117 रन एवढा आहे. फेब्रुवारी 2010 साली ऋद्धीमान साहा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या