मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियाच्या खेळाडूंनी मोडला बायो सिक्युरिटी प्रोटोकॉल! BCCI कडून चौकशी सुरू

टीम इंडियाच्या खेळाडूंनी मोडला बायो सिक्युरिटी प्रोटोकॉल! BCCI कडून चौकशी सुरू

बीसीसीआय (BCCI) ने भारतीय खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नव्या वर्षी टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले.

पुढे वाचा ...

मेलबर्न 2 जानेवारी : बीसीसीआय (BCCI) ने भारतीय खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नव्या वर्षी टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. त्यामुळे खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉलचं उल्लंघन करताना दिसले. हॉटेलमध्ये जेवत असतानाचे भारतीय खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

भारतीय खेळाडूंनी चेडस्टन शॉपिंग सेंटरच्या बारबीक्यू रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टीम इंडियाचे खेळाडू जेवायला आल्याचं सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना मान्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे दोन्ही खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. खेळाडूंना बाहेर जाऊन खाण्याची परवानगी असली तरी त्यांना हॉटेलच्या आत नाही तर बाहेर बसावं लागेल, असा नियम करण्यात आला आहे. पण या फोटोंमध्ये टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलच्या आतमध्ये बसून जेवताना दिसत आहेत.

भारतीय खेळाडूंच्या जेवणाचं बिल टीम इंडियाचा चाहता नवलदीप सिंह याने दिलं होतं. याबाबतचा एक व्हिडिओ आणि फोटो त्याने पोस्ट केला होता. भारतीय खेळाडूंनी हॉटेलमध्ये सॉय सॉस चिकन, चिकन मशरूम आणि डाएट कोक प्यायलं, याचं बिल 118.69 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 6,683 भारतीय रुपये झालं.

टीम इंडियाच्या या चाहत्याने भूक नसतानाही खेळाडूंना पाहता यावं, म्हणून आणखी खाण्याची ऑर्डर केली होती. बिल दिल्यानंतर ऋषभ पंतने नवलदीप सिंग आणि त्याच्या पत्नीचे आभार मानले.

First published:
top videos