मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ...तेव्हा हार्दिक पांड्याला क्रिकेट सोडण्याचा मिळाला होता सल्ला

IND vs AUS : ...तेव्हा हार्दिक पांड्याला क्रिकेट सोडण्याचा मिळाला होता सल्ला

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने भारतीय टीम (Team India) मध्ये ऑलराऊंडर म्हणून स्थान मिळवलं होतं, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये हार्दिकला बॅट्समन म्हणून टीममध्ये घेतलं होतं.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 27 डिसेंबर : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने भारतीय टीम (Team India) मध्ये ऑलराऊंडर म्हणून स्थान मिळवलं होतं, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये हार्दिकला बॅट्समन म्हणून टीममध्ये घेतलं होतं. हार्दिकच्या या निवडीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते, कारण हार्दिकला बॅट्समन म्हणून टीममध्ये घेतल्यामुळे विराटकडे बॉलिंगसाठी फक्त 5 पर्याय होते. एखाद्या बॉलरला दुखापत झाली असती किंवा त्याची कामगिरी खराब झाली तर या परिस्थितीमध्ये विराटकडे सहावा बॉलर नसल्यामुळे हार्दिकला खेळवण्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.

हार्दिक पांड्या कंबरेच्या दुखापतीमुळे बॉलिंग करत नाही. आयपीएल (IPL 2020)मध्येही हार्दिकने मुंबई (Mumbai Indians) कडून खेळताना फक्त बॅटिंगच केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये हार्दिक मैदानात उतरला तेव्हा मोहम्मद कैफने त्याच्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला. हार्दिक पांड्याला क्रिकेट सोडण्याचाही सल्ला देण्यात आला होता.

मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने सोनी नेटवर्कवर हिंदी कॉमेंट्री करताना सांगितलं की हार्दिक पुढची काही वर्ष बॉलिंग करू शकणार नाही. हार्दिकच्या कंबरेला झालेली दुखापत खूप गंभीर होती, त्यामुळे फिजियोने त्याला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला होता, पण पांड्याने याला नकार दिला आणि त्याने स्वत:च्या फिटनेसवर काम केलं. पांड्याला आता बॅट्समन म्हणून खेळायचं आहे आणि टीम इंडियाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे, असं कैफ म्हणाला.

हार्दिक पांड्याचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

पांड्याचं शतक थोडक्यात हुकलं

हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये 76 बॉलमध्ये 90 रनची आक्रमक खेळी केली. पांड्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. पांड्या जेव्हा मैदानात उतरला तेव्हा भारताने चार विकेट गमावल्या होत्या, पण तरीही हार्दिकने एका बाजूने आक्रमण सुरूच ठेवलं. पांड्याने 31 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक केलं. हार्दिक आणि शिखर धवन यांच्यामध्ये शतकीय पार्टनरशीप झाली, पण तरीही भारताला विजय मिळाला नाही.

First published: