मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : रोहित शर्मावर संतापले सुनील गावसकर

IND vs AUS : रोहित शर्मावर संतापले सुनील गावसकर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये (India vs Australia) रोहित शर्मा खराब शॉट खेळून आऊट झाला, यानंतर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याच्यावर टीका केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये (India vs Australia) रोहित शर्मा खराब शॉट खेळून आऊट झाला, यानंतर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याच्यावर टीका केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये (India vs Australia) रोहित शर्मा खराब शॉट खेळून आऊट झाला, यानंतर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याच्यावर टीका केली.

ब्रिस्बेन, 16 जानेवारी : रोहित शर्मा (Rohit Sharma) हा वनडे आणि टी-20 मधल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, त्याची रेकॉर्डही हेच सिद्ध करतात. पण जेव्हा वेळ टेस्ट क्रिकेटची येते तेव्हा तो अनेकवेळा निशाण्यावर येतो. रोहित शर्मा जेव्हापासून टेस्टमध्ये ओपनिंग करायला लागला, तेव्हा त्याने उत्कृष्ट बॅटिंग केली, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) टेस्ट सीरिजमध्ये तो वारंवार चुका करत आहे, ज्यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे.

ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही रोहित शर्मा लयीत दिसत होता, तेव्हा त्याने खराब शॉट मारून आपली विकेट दिली. नॅथन लायनने टाकलेला बॉल रोहित शर्मा हवेत खेळला आणि मिचेल स्टार्कने त्याचा कॅच पकडला. रोहित शर्मा आऊट होताच सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच भडकले आणि त्यांनी रोहितवर टीका केली.

'काय गरज आहे असा बेजबाबदार शॉट खेळायची? डीप स्क्वेअर लेगवर फिल्डर उभा आहे. दोन बॉल पहिले तू एक फोर मारली आहेस, असा शॉट कोण मारतं? तू एक वरिष्ठ खेळाडू आहेस, या शॉटसाठी कोणतंही कारण नाही. आपण स्वत:ची विकेट गिफ्ट म्हणून दिली आहे,' असं गावसकर म्हणाले.

रोहित शर्माची अति-आक्रमकता

रोहित शर्माने गाबाच्या उसळत्या खेळपट्टीवर शानदार सुरूवात केली. त्याने 6 फोरच्या मदतीने 44 रन केले, पण 20 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर रोहितने लायनला मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल हवेमध्ये जाऊन स्टार्कने कॅच पकडला.

संजय मांजरेकर यांनीही रोहित शर्माच्या या शॉटवर टीका केली. रोहित शर्माचा हा शॉट बेजबाबदार असल्याचं ट्विट मांजरेकर यांनी केलं. रोहितआधी शुभमन गिलही खराब शॉट खेळून आऊट झाला. दुसऱ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर 62-2 एवढा आहे. ऑस्ट्रेलिया अजूनही 307 रन पुढे आहे. भारताला आता पुजारा आणि रहाणेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

First published:
top videos