मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : ऋषभ पंतने मॅथ्यू वेडवर केलेल्या टिप्पणीमुळे भडकले वॉर्न-वॉ

IND vs AUS : ऋषभ पंतने मॅथ्यू वेडवर केलेल्या टिप्पणीमुळे भडकले वॉर्न-वॉ

भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या आक्रमक बॅटिंगसोबतच विकेट कीपिंग करतानाच्या टिप्पणींमुळे चर्चेत असतो. यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) आणि मार्क वॉ (Mark Waugh) चांगलेच भडकले.

ब्रिस्बेन, 16 जानेवारी : भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या आक्रमक बॅटिंगसोबतच विकेट कीपिंग करतानाच्या टिप्पणींमुळे चर्चेत असतो. खेळपट्टीच्या मागून पंत भारतीय बॉलरचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर करतोच पण विरोधी टीमच्या बॅट्समनला स्लेजिंगही करतो. ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्येही पंतने हेच केलं. पंत वारंवार ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन मॅथ्यू वेड (Mathew Wade) याला त्रास देत होता. यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) आणि मार्क वॉ (Mark Waugh) चांगलेच भडकले.

मॅचच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) बॉलिंग करत होता, तेव्हा त्याच्यासमोर वेड होता. यावेळी पंत मागून सारखा बोलत होता. पंतच्या या बोलण्यावर मार्क वॉने नाराजी जाहीर केली. 'मला विकेट कीपरच्या बोलण्यावर काहीही आक्षेप नाही, पण जेव्हा बॉलर बॉलिंग करत असेल, तेव्हा असं करू नये. तुम्ही गप्प बसू शकता. अशा स्थितीमध्ये अंपायरने दखल दिली पाहिजे. हे खेळाडूंच्या हातात नाही,' असं मार्क वॉ म्हणाला.

शेन वॉर्न यानेही मार्क वॉच्या विचारांशी सहमती दर्शवली. 'पंतला विरोधी टीमच्या बॅट्समनना छेडण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण जेव्हा बॉलर रन अप घेत असतो तेव्हा हे होता कामा नये. जेव्हा बॉलर धावायला सुरूवात करतो तेव्हा तुम्ही शांत झालं पाहिजे आणि बॅट्समनला एकाग्र होऊ दिलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया शेन वॉर्नने दिली.

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये स्लेजिंगच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. सिडनी टेस्टमध्ये अश्विन बॅटिंग करत असतानाही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विकेट कीपर टीम पेन वारंवार त्याला त्रास देत होता. मॅच संपल्यानंतर पेनने अश्विनची माफीही मागितली.

First published:
top videos