Home /News /sport /

IND vs AUS : पुजारा आऊट का नॉट आऊट? मॅकग्रा-मांजरेकर भिडले

IND vs AUS : पुजारा आऊट का नॉट आऊट? मॅकग्रा-मांजरेकर भिडले

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चौथ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) यांच्यात वाद झाला.

    ब्रिस्बेन, 19 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चौथ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath)  यांच्यात वाद झाला. दोन्ही क्रिकेटपटू डीआरएसच्या निर्णयावर एकमेकांशी सहमत नव्हते. पुजाराला आऊट न दिल्यामुळे ग्लेन मॅकग्रा नाराज झाला. जर हादेखील आऊट नसेल, तर आऊट कशाला दिलं जाईल? असा प्रश्न मॅकग्राने विचारला, तर तंत्रज्ञानाच्या जमान्यात असे निर्णय आपण स्वीकारले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया संजय मांजरेकर यांनी दिली. मॅचच्या पाचव्या दिवशी 18व्या ओव्हरमध्ये नॅथन लायनच्या बॉलिंगवर पुजाराच्या पॅडला बॉल लागला, यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमने अपील केलं, पण अंपायरने त्याला आऊट दिलं नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घ्यायचा निर्णय घेतला. रिप्लेमध्ये बॉल लेग स्टम्पला थोडासा लागत असल्याचं दिसलं. यानंतर थर्ड अंपायरने अंपायर्स कॉल असल्याचं सांगून पुजाराला नॉट आऊट दिलं. सोनी सिक्सवर कॉमेंट्री करताना लंच ब्रेकमध्ये संजय मांजरेकर आणि ग्रेन मॅकग्रा यांच्यात या निर्णयावरून चर्चा झाली. 'टीव्ही रिप्लेमध्ये बॉलचा बराच भाग लेग स्टम्पला लागत असल्याचं दिसत आहे. यानंतरही बॅट्समनला आऊट दिलं जात नसेल, तर आऊट कधी दिलं जाईल, माझ्यामते पुजारा आऊट होता,' असं मॅकग्रा म्हणाला. मॅकग्राच्या या आक्षेपाला संजय मांजरकेर यांनी उत्तर दिलं. 'हे पहिल्यांदाच झालेलं नाही. जेव्हा अंपायर्स कॉलवर बॅट्समनला आऊट देण्यात आलं नाही. डीआरएसच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करत आपण बॉल स्टम्पला लागतो का नाही, ते पाहतो. अशा प्रकरणांमध्ये काही मिलिमीटरच्या अंतराचा आधार घेऊन अंपायरचा निर्णय कायम ठेवण्यात येत असेल, तर मी त्याचं समर्थन करेन,' अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या