मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ...म्हणून फक्त एका बॉलसाठी रोहितने केली बॉलिंग

IND vs AUS : ...म्हणून फक्त एका बॉलसाठी रोहितने केली बॉलिंग

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma) ने बऱ्याच कालावधीनंतर बॉलिंग केली

  • Published by:  Shreyas

ब्रिस्बेन, 15 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma) ने बऱ्याच कालावधीनंतर बॉलिंग केली, पण रोहितची ही बॉलिंग फक्त एका बॉल पुरती मर्यादित राहिली. 35व्या ओव्हरचा शेवटचा बॉल रोहित शर्माने टाकला.

35व्या ओव्हरचे पहिले पाच बॉल टाकल्यानंतर नवदीप सैनी (Navdeep Saini) च्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली. या दुखापतीमुळे सैनी मैदानाबाहेर गेला, तेव्हा त्याची उरलेली ओव्हर रोहित शर्माने पूर्ण केली.

या खेळाडूंना दुखापत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीमला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह हे फास्ट बॉलरही सीरिजमधून बाहेर झाले. तर केएल राहुलही भारतामध्ये परतला. रविंद्र जडेजा, हनुमा विहारी आणि आर.अश्विन या दोघांनाही दुखापतीमुळे या टेस्टमध्ये खेळता आलं नाही. आयपीएलदरम्यान इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्यामुळे दोघंही ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकले.

दुखापतींमुळे या मॅचमध्ये भारतीय टीमने या मॅचसाठी मोठे बदल केले. हनुमा विहारीऐवजी मयंक अगरवाल, रविंद्र जडेजाऐवजी शार्दुल ठाकूर, आर.अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर तर जसप्रीत बुमराहच्याऐवजी टी.नटराजन यांना संधी देण्यात आली आहे. टी.नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर याचं टेस्ट क्रिकेटमधला हा पदार्पणाचा सामना आहे.

First published: