ब्रिस्बेन, 15 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India vs Australia) दुखापती काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत. चौथ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी नवदीप सैनी (Navdeep Saini) ला बॉलिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे बॉलिंग अर्धवट सोडून तो ड्रेसिंग रूममध्ये गेला. सैनीची उरलेली ओव्हर रोहित शर्माने पूर्ण केली.
36 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने मार्नस लाबुशेनचा सोपा हातातला कॅच सोडला, यानंतर लगेचच सैनीच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला. यानंतर लगेचच फिजियोथेरपिस्ट मैदानात आले आणि त्यांनी सैनीची दुखापत बघितली. यानंतर सैनी मैदानातून बाहेर गेला.
याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह हे फास्ट बॉलरही सीरिजमधून बाहेर झाले. तर केएल राहुलही भारतामध्ये परतला. रविंद्र जडेजा, हनुमा विहारी आणि आर.अश्विन या दोघांनाही दुखापतीमुळे या टेस्टमध्ये खेळता आलं नाही. आयपीएलदरम्यान इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्यामुळे दोघंही ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकले.
दुखापतींमुळे या मॅचमध्ये भारतीय टीमने या मॅचसाठी मोठे बदल केले. हनुमा विहारीऐवजी मयंक अगरवाल, रविंद्र जडेजाऐवजी शार्दुल ठाकूर, आर.अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर तर जसप्रीत बुमराहच्याऐवजी टी.नटराजन यांना संधी देण्यात आली आहे. टी.नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर याचं टेस्ट क्रिकेटमधला हा पदार्पणाचा सामना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.