मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : नॅथन लायनने दिलं ऋषभ पंतला आव्हान, म्हणाला...

IND vs AUS : नॅथन लायनने दिलं ऋषभ पंतला आव्हान, म्हणाला...

सिडनी टेस्टमध्ये वादळी खेळी करणाऱ्या ऋषभ पंतचं (Rishabh Pant) भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही कौतुक केलं. आता मात्र नॅथन लायनने (Nathan Lyon) पंतला डिवचलं आहे.

ब्रिस्बेन, 16 जानेवारी : सिडनी टेस्टमध्ये वादळी खेळी करणाऱ्या ऋषभ पंतचं (Rishabh Pant) भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही कौतुक केलं. ब्रिस्बेन टेस्टमध्ये अजून तरी पंतला बॅटिंगची संधी मिळालेली नाही, पण त्याआधीच ऑस्ट्रेलियाकडून पंतला डिवचायला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायनने (Nathan Lyon) पंतला आव्हान दिलं आहे. पंतने आपल्याविरुद्ध पुन्हा मोठे शॉट मारावे, असं लायन म्हणाला आहे. त्याने दुसऱ्या दिवशी रोहित शर्माची मोठी विकेट घेतली. लायनची ही 100वी टेस्ट आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर लायन म्हणाला, 'ऋषभ पंत नेहमी माझ्या बॉलिंगला मोठे शॉट मारतो. मी त्याला बॉलिंग करण्यासाठी उत्सुक आहे,' असं लायन म्हणाला. लायनने टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत 397 विकेट घेतल्या आहेत.

सिडनी टेस्टमध्ये पंतने 97 रनची महत्त्वाची खेळी केली. पंतच्या या आक्रमणावेळी भारत ही टेस्ट जिंकेल असं वाटत होतं. लायनच्या बॉलिंगवर पंतचे दोन कॅचही सुटले. या चुकीचा फायदा पंतने करून घेतला, पण त्याला शतक करता आलं नाही. ऋषभ पंतची खेळी आणि अश्विन-विहारीचा संयम यामुळे भारताला ही टेस्ट मॅच ड्रॉ करण्यात यश आलं.

दुसऱ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर 62-2 एवढा आहे. ऑस्ट्रेलिया अजूनही 307 रन पुढे आहे. भारताला आता पुजारा आणि रहाणे तसंच पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

First published:
top videos