मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS 4th Test : लाबुशेनचं शतक, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम

IND vs AUS 4th Test : लाबुशेनचं शतक, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम

भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) मोठी धावसंख्या उभारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 274/5 असा झाला आहे.

  • Published by:  Shreyas

ब्रिस्बेन, 15 जानेवारी : भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) मोठी धावसंख्या उभारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 274/5 असा झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या दोन लवकर गेल्यानंतर मार्नस लाबुशेनने पहिले स्टीव्ह स्मिथ आणि मग मॅथ्यू वेडसोबत महत्त्वाची पार्टनरशीप केली. लाबुशेन 204 बॉलमध्ये 108 रन करून आऊट झाला. तर स्मिथने 36 रन आणि मॅथ्यू वेडने 45 रन केले.

आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या टी नटराजन याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या या मॅचसाठी दुखापतींमुळे टीम इंडियाला मोठे बदल करावे लागले. बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाल्यामुळे टी.नटराजन (T. Natrajan) याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. तर अश्विन ( R Ashwin) देखील फिट न झाल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sunder) ही आपली पहिली टेस्ट खेळण्याची संधी मिळाली आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऐवजी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याची टीममध्ये निवड झाली आहे. तर हनुमा विहारी (Hanuma Vihari) ऐवजी मयंक अगरवाल(Mayank Agarwal) ला खेळवण्यात येत आहे.

सीरिजमधल्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमने धमाकेदार पुनरागमन करत विजय मिळवला, यानंतर तिसऱ्या टेस्टमध्येही पराभव होईल, असं वाटत असताना दुखापतींचा सामना करत विहारी आणि अश्विन शेवटच्या दिवशी मैदानात टिकून राहिले, ज्यामुळे मॅच ड्रॉ झाली. चार टेस्ट मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून सीरिजवर कब्जा करण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरल्या आहेत.

भारतीय टीम

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी.नटराजन

ऑस्ट्रेलियाची टीम

डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉस हेजलवूड

First published: