मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : ब्रिस्बेन टेस्टमध्ये या भारतीय खेळाडूला संधी नाही, चाहते नाराज

IND vs AUS : ब्रिस्बेन टेस्टमध्ये या भारतीय खेळाडूला संधी नाही, चाहते नाराज

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजचा चौथा आणि अखेरचा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या टीम निवडीवर चाहत्यांकडून टीका होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजचा चौथा आणि अखेरचा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या टीम निवडीवर चाहत्यांकडून टीका होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजचा चौथा आणि अखेरचा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या टीम निवडीवर चाहत्यांकडून टीका होत आहे.

    ब्रिस्बेन, 15 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजचा चौथा आणि अखेरचा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या टीम निवडीवर चाहत्यांकडून टीका होत आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही टीमनी एक-एक सामना जिंकला असून तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे मालिका विजयाच्या दृष्टीने हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे.

    भारतीय टीममधील खेळाडूंना दुखापत झाल्याने, अनेक महत्त्वाचे खेळाडू या सामन्यात खेळू शकणार नाहीत, असं असतानाही अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ला संधी देण्यात आली नाही. त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज टी. नटराजन (T Natrajan) याला भारतीय टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे चाहते प्रचंड नाराज आहेत. आज सामन्यात खेळणाऱ्या भारतीय टीममध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, टी. नटराजन, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.

    भारतीय टीम व्यवस्थापनाने कुलदीपकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोशल मीडियावर नाराजीचा सूर उटमत आहे. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांनी 2019 च्या सिडनीतील कसोटी सामन्यानंतर म्हटलं होतं, ‘भविष्यात कुलदीप सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा क्रमांक 1 चा फिरकीपटू असेल.’ हे वाक्य ट्विट करून चाहत्यानी म्हटलंय तेव्हापासून कुलदीप यादव कसोटी खेळलेला नाही. आणखी एकानी तर थेट प्रश्न विचारालाय की कुलदीपनी काय गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला बाहेर ठेवलं जातंय?

    कुलदीपला बाहेर ठेवण्यामागे त्याची बॅटिंद कमकुवत असल्याचं कारण दिलं जातयं, दरम्यान, टी. नटराजनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो भारताकडून कसोटी खेळणारा 300 वा खेळाडू ठरला. त्याचबरोबर एकाच दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळालेला पहिला खेळाडू होण्याचा मान टी. नटराजनला मिळाला आहे. खरं तर आयपीएल 2020 मधील कामगिरीच्या जोरावर नटराजनला टी-20 स्पेशलिस्ट म्हणून भारतीय टीममध्ये निवडलं होतं. पण त्याला या दौऱ्यात उत्तम संधी मिळाली. नटराजनने प्रथम श्रेणीचे 20 सामने, अ दर्जाचे 15 सामने आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

    First published: