मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS 4th Test LIVE : चांगल्या सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला धक्के

IND vs AUS 4th Test LIVE : चांगल्या सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला धक्के

भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs Australia) वॉर्नर (David Warner) आणि हॅरिसच्या (Marcus Harris) जोडीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांमध्ये 89 रनची पार्टनरशीप झाली, पण यानंतर भारतीय बॉलरनी कांगारूंना लागोपाठ धक्के दिले.

पुढे वाचा ...

ब्रिस्बेन, 18 जानेवारी : भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs Australia) वॉर्नर (David Warner) आणि हॅरिसच्या (Marcus Harris) जोडीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांमध्ये 89 रनची पार्टनरशीप झाली, पण यानंतर भारतीय बॉलरनी कांगारूंना लागोपाठ धक्के दिले. 89 रनवर पहिली विकेट गेल्यानंतर 123 रनवर त्यांचे 4 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. भारताकडून मोहम्मद सिराजने 2 तर वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

चौथ्या दिवसाची सुरूवात ऑस्ट्रेलियाने 21/0 अशी केली होती. पहिल्या इनिंगमध्ये त्यांना 33 रनची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या 369 रननंतर बॅटिंगला उतरलेल्या भारताला 336 रनपर्यंत मजल मारता आली.

भारताची अवस्था 186/6 अशी झालेली असताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी 123 रनची पार्टनरशीप केली. शार्दुल ठाकूरने 115 बॉलमध्ये 67 रन केले, तर वॉशिंग्टन सुंदर 62 रन करून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने 5 विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. नॅथन लायनला एक विकेट घेण्यात यश आलं.

सीरिजमधल्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमने धमाकेदार पुनरागमन करत विजय मिळवला, यानंतर तिसऱ्या टेस्टमध्येही पराभव होईल, असं वाटत असताना दुखापतींचा सामना करत विहारी आणि अश्विन शेवटच्या दिवशी मैदानात टिकून राहिले, ज्यामुळे मॅच ड्रॉ झाली. चार टेस्ट मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून सीरिजवर कब्जा करण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरल्या आहेत.

First published: