मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : चौथ्या टेस्टमध्ये 'टीम इंडिया'सोबत धोका, पाहा मैदानात काय झालं?

IND vs AUS : चौथ्या टेस्टमध्ये 'टीम इंडिया'सोबत धोका, पाहा मैदानात काय झालं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी डेव्हिड वॉर्नरने (David Warner) घेतलेला रिव्ह्यू (DRS) वादात सापडला आहे.

ब्रिस्बेन, 18 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी डेव्हिड वॉर्नरने (David Warner) घेतलेला रिव्ह्यू (DRS) वादात सापडला आहे. क्रिकेट चाहत्यांनी ही बेईमानी असल्याचा आरोपही केला आहे. वॉर्नरला टाईम आऊट झाल्यानंतर रिव्ह्यू देण्यात आल्यामुळे, थर्ड अंपायरचं लक्ष कुठे होतं? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

चौथ्या दिवशी डेव्हिड वॉर्नरने दुसऱ्या इनिंगमध्ये कांगारूंना चांगली सुरूवात करून दिली. मोहम्मद सिराजच्या सुरूवातीच्या दोन ओव्हरमध्ये दोन फोर मारून वॉर्नरने ऑस्ट्रेलियाची आघाडी 100 रनच्या पुढे नेली.

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात वॉर्नरने एक-एक रनही काढल्या. पण एका तासाच्या खेळानंतर दोन्ही ओपनरनी विकेट गमावल्या. मार्कस हॅरिसला 38 रनवर शार्दुल ठाकूरने माघारी धाडलं. तर पुढच्याच ओव्हरमध्ये वॉर्नरला वॉशिंग्टन सुंदरने एलबीडब्ल्यू केलं.

अंपायरने आऊट दिल्यानंतर वॉर्नरने पॅव्हेलियनच्या दिशेने जायचं ठरवलं, पण लाबुशेनच्या सल्ल्यानंतर त्याने रिव्ह्यू घ्यायचा निर्णय घेतला, पण या सगळ्यामध्ये 15 सेकंद निघून गेली होती, असं असलं तरी अंपायरने त्याला रिव्ह्यू दिला. या रिव्ह्यूचा वॉर्नरला काहीही फायदा झाला नाही, उलट ऑस्ट्रेलियाला डीआरएस गमवावा लागला. 75 बॉलमध्ये 6 फोर मारत वॉर्नरने 48 रन केले.

First published: