ऍडलेड, 18 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिज (Border Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. ऍडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने संयमी बॅटिंग करून 180 बॉलमध्ये 74 रन केले. अजिंक्य रहाणेने केलेल्या चुकीमुळे विराटला रन आऊट व्हावं लागलं. 123 बॉलमध्ये विराटने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. विराटचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 23वं अर्धशतक होतं. अर्धशतकाआधी विराटला मैदानात दुखापतही झाली होती, तरीही विराट मैदान सोडून गेला नाही.
स्टार्कच्या बॉलिंगवर विराट जखमी
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने विराटला शॉर्ट पिच बॉलिंग केली. यातला एक बॉल विराटच्या हाताला लागला आणि त्याच्या अंगठ्यातून रक्त यायला लागलं. यानंतर टीम इंडियाचे फिजियो लगेच मैदानात आले आणि त्यांनी विराटच्या हाताला औषध लावलं. बॉल लागल्यानंतर विराटला खूप दुखत असल्याचं त्याच्या हावभावावरून दिसत होतं, पण त्याने मैदान सोडलं नाही. टीम इंडियाच्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर विराटने जबाबदारी सांभाळली.
Virat Kohli gets hit on the glove by a lifter from Starc, and is now receiving treatment #AUSvIND pic.twitter.com/zBCZBWtE23
— 7Cricket (@7Cricket) December 17, 2020
विराट कोहलीने चेतेश्वर पुजारासोबत 191 बॉलमध्ये 68 रनची पार्टनरशीप केली, तर विराट आणि अजिंक्य यांच्यात 88 रनची पार्टनरशीप झाली. या मॅचमध्ये विराटचा स्ट्राईक रेट कमी राहिला, त्याने ऑस्ट्रेलियाच्या शॉर्ट पिच बॉलिंगवर हल्ला केला नाही. ऍडलेडच्या या मैदानात विराटचं रेकॉर्ड चांगलं आहे. या मैदानात विराटने 3 शतकं केली आहेत, तर ऑस्ट्रेलियात विराटच्या नावावर 6 शतकं आहेत.