Home /News /sport /

IND vs AUS : मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार कोहलीची पहिली प्रतिक्रिया

IND vs AUS : मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार कोहलीची पहिली प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. क्रिकेट इतिहासात भारतीय टीम निच्चांकी स्कोअरवर आऊट झाली. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने प्रतिक्रिया दिली आहे.

    ऍडलेड, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. क्रिकेट इतिहासात भारतीय टीम निच्चांकी स्कोअरवर आऊट झाली. पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये भाराताचा अवघ्या 36 रनवर ऑल आऊट झाला. या पराभवानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे बोलण्यासाठी शब्दही नव्हते. मॅच संपल्यानंतर विराट कोहली याला या पराभवाची समीक्षा करायला सांगितलं, तेव्हा याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दही नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. 'मला काय वाटत आहे, हे मी सांगू शकत नाही. आम्ही मैदानात उतरलो होतो, तेव्हा आमच्याकडे 60 पेक्षा जास्त रनची आघाडी होती, यानंतर टीम पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. आम्ही दोन दिवस चांगलं क्रिकेट खेळलो, पण एका तासात मॅच गमावली. या पराभामुळे खूप दु:ख झालं आहे,' असं विराट म्हणाला. विराटने पराभवाबाबत बॅट्मनना दोष दिला. 'बॅट्समननी रन काढण्याची जिद्दच दाखवली नाही. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी पहिल्या इनिंगसारखीच बॉलिंग केली, पण पहिल्या इनिंगमध्ये आमचं लक्ष्य काहीही करून रन करणं हे होतं. ऑस्ट्रेलियाने चांगली बॉलिंग केली, पण खेळपट्टीवर असं काही झालं नाही, ज्यामुळे एवढी वाईट कामगिरी झाली. कमी जिद्द आणि ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या बॉलिंगमुळे आम्हाला सामना गमवावा लागला,' असं वक्तव्य विराटने केलं. पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर विराटने टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमनाचा विश्वास दर्शवला आहे. 'पुढच्या टेस्टमध्ये भारतीय टीम पलटवार करेल, अशी माझी अपेक्षा आहे. बॉक्सिंग डे टेस्टचा निकाल आमच्या बाजूने असेल,' असं विराट म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या उरलेल्या तिन्ही टेस्ट मॅचचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या