Home /News /sport /

IND vs AUS : विराटला ऑस्ट्रेलियाने दिलं 'गिफ्ट', मैदानात केल मोठी चूक

IND vs AUS : विराटला ऑस्ट्रेलियाने दिलं 'गिफ्ट', मैदानात केल मोठी चूक

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला (Border-Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियासाठी या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ची विकेट सगळ्यात जास्त महत्त्वाची होती

    ऍडलेड, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला (Border-Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियासाठी या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ची विकेट सगळ्यात जास्त महत्त्वाची होती, पण त्यांनी भारताच्या कर्णधाराला मोठं गिफ्ट दिलं. ऍडलेड टेस्टच्या दुसऱ्या सत्रात नॅथन लायन (Nathan Lyon) याने टाकलेला बॉल विराटच्या ग्लोव्हजला लागला आणि विकेट कीपर टीम पेनच्या हातात गेला. टीम पेनला याचा आवाज न आल्यामुळे त्याने डीआरएस घेतला नाही. पण रिप्ले बघितल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमला धक्का बसला. 36 व्या ओव्हरमध्ये लायनने टाकलेला पहिला बॉल जास्त स्पिन झाला. लायनने टाकलेला हा बॉल विराटच्या ग्लोव्हजला लागून पेनच्या हातात गेला. यानंतर शॉर्ट लेगवर उभा असलेला मॅथ्यू वेड जोरदार अपील करायला लागला. दोघांनीही रिव्ह्यू घेण्याबाबत चर्चा केली, पण बॉल ग्लोव्हजला लागला नसल्याचं पेनला वाटलं, त्यामुळे पेनने डीआरएस घेतला नाही. हॉटस्पॉटवर बॉल विराटच्या ग्लोव्हजवर लागल्याचं स्पष्ट दिसत होतं, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने जर रिव्ह्यू घेतला असता, तर विराटला आऊट देण्यात आलं असतं. विराट ऍडलेडवर धोकादायक विराट कोहलीला मिळालेलं हे जीवनदान ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरू शकते. कारण ऍडलेडमध्ये विराटचं रेकॉर्ड जबरदस्त आहे. या मैदानात विराटने 3 शतकं केली आहेत, यामध्ये त्याची सरासरी 70 पेक्षा जास्त आहे. या मॅचमध्ये विराट टिकून खेळला, तर डीआरएस न घेण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय त्यांच्याच अंगाशी येऊ शकतो.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या