Home /News /sport /

IND vs AUS : शतकांचा दुष्काळ, विराटच्या नावावर नकोसा विक्रम

IND vs AUS : शतकांचा दुष्काळ, विराटच्या नावावर नकोसा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननी (India vs Australia) लाजीरवाणी कामगिरी केली आहे. याचसोबत विराट कोहली (Virat Kohli) साठी 2020 हे नकोसं वर्षही संपलं आहे.

    ऍडलेड, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननी लाजीरवाणी कामगिरी केली आहे. ऍडलेड टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव 36 रनवर संपुष्टात आला. या मॅचमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे शून्य रनवर आऊट झाले, तर विराट कोहली (Virat Kohli) चार रन करून माघारी गेला. याचसोबत विराट कोहलीचं 2020 हे वर्ष संपुष्टात आलं आहे. सीरिजमधल्या उरलेल्या मॅचमध्ये विराट कोहली खेळणार नाही. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट हा दौरा अर्धवट सोडून येणार आहे. बीसीसीआयनेही विराटची रजा मंजूर केली आहे. 2020 या वर्षात विराट कोहलीला वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. याआधी 2008 साली विराटला वनडेमध्ये एकही शतक करता आलं नव्हतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट शतकाच्या जवळ होता, पण 74 रनवर तो आऊट झाला. या वर्षातल्या सहा टेस्ट इनिंगमध्ये विराटने 2, 19, 3, 14, 74 आणि 4 रन केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन वनडे सीरिजदरम्यान विराट कोहलीने 12 हजार रनचा टप्पा ओलांडला. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 12 हजार रन करण्याचा विक्रम विराटने त्याच्या नावावर केला. यावर्षी खेळलेल्या 9 वनडे मॅचमध्ये विराटने 5 अर्धशतकांच्या मदतीने 431 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या