IND vs AUS : पृथ्वी शॉने कॅच सोडल्यानंतर भडकला कोहली, मैदानातच घातली शिवी

IND vs AUS : पृथ्वी शॉने कॅच सोडल्यानंतर भडकला कोहली, मैदानातच घातली शिवी

टीम इंडियाचा खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट (India vs Australia) वाईट स्वप्नापेक्षाही खराब ठरत आहे. पृथ्वी शॉ याने कॅच सोडल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने मैदानात अपशब्द वापरले.

  • Share this:

ऍडलेड, 18 डिसेंबर : टीम इंडियाचा खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट (India vs Australia) वाईट स्वप्नापेक्षाही खराब ठरत आहे. बॅटिंगमध्ये शून्य रनवर आऊट झालेल्या शॉ याने फिल्डिंग करतानाही अगदी सोपा कॅच सोडला. यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्यावर चांगलाच भडकला. विराटच्या तोंडातून यावेळी अपशब्द उच्चारला गेला.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू असताना 23व्या ओव्हरमध्ये बुमराहने लाबुशेनला बाऊन्सर टाकला, यावर त्याने पूल मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल हवेत गेला. स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या पृथ्वी शॉला हा सोपा कॅच पकडता आला नाही. शॉने कॅच सोडल्यानंतर बुमराह हसला, पण कोहलीच्या तोंडातून मात्र शिवी निघाली.

या मॅचमध्ये भारताने एकूण चार कॅच सोडले आहेत. पृथ्वी शॉच्या आधी बुमराह आणि ऋद्धीमान साहा यानेही लाबुशेनला जीवनदान दिलं. तर दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयंक अगरवाल याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याचा कॅच सोडला.

पहिल्या सत्राच्या शेवटी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने बाऊंड्री लाईनवर मार्नस लाबुशेनचा हातातला कॅच सोडला. इनिंगच्या 18 व्या ओव्हरचा पाचवा बॉल मोहम्मद शमीने बाऊन्सर टाकला. या बॉलवर लाबुशेनने पूल शॉट मारला, पण बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या बुमराहला हा कॅच पकडता आला नाही आणि बॉल बाऊंड्रीच्या दिशेने गेला. बुमराहने कॅच सोडला तेव्हा लाबुशेन 12 रनवर खेळत होता.

एकीकडे भारताने खराब फिल्डिंग केली असतानाच विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने जबरदस्त कॅच पकडले. रहाणेने स्लिपमध्ये स्मिथचा तर विराट कोहलीने शॉर्ट मिडविकेटवर कॅमरून ग्रीनचा अफलातून कॅच पकडला.

Published by: Shreyas
First published: December 18, 2020, 3:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या