Home /News /sport /

IND vs AUS : टेस्टमध्ये 23 वेळा टीम 50 पेक्षा कमी स्कोअरवर ऑल आऊट, पाहा भारत कितव्या स्थानी

IND vs AUS : टेस्टमध्ये 23 वेळा टीम 50 पेक्षा कमी स्कोअरवर ऑल आऊट, पाहा भारत कितव्या स्थानी

ऍडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेणाऱ्या भारताला (India vs Australia) ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये जोरदार धक्का दिला. फक्त 36 रनवरच भारतीय टीम ऑल आऊट झाली.

    ऍडलेड, 19 डिसेंबर : ऍडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेणाऱ्या भारताला (India vs Australia) ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये जोरदार धक्का दिला. फक्त 36 रनवरच भारतीय टीम ऑल आऊट झाली. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे दिग्गज बॅट्समन असतानाही भारताची बॅटिंग गडगडली. या इनिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. टेस्ट क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा सगळ्यात निच्चांकी स्कोअर आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 23 वेळा वेगवेगळ्या टीम 50 पेक्षा कमी धावसंख्येवर ऑल आऊट झाल्या आहेत. 143 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात 23 व्यांदा एखादी टीम 50 रनच्या आत ऑल आऊट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम सर्वाधिक 7 वेळ 50 रनच्या आत ऑल आऊट झाली. तर भारताला दुसऱ्यांदा 50 रनचा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची टीम 4-4 वेळा 50 रनच्या आत ऑल आऊट झाली. इंग्लंड दोन वेळा आणि पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज, आयर्लंड एक-एक वेळा 50 रनच्या आत ऑल आऊट झाल्या. न्यूझीलंडची टीम 1955 साली इंग्लंडविरुद्ध फक्त 26 रनवर ऑल आऊट झाली होती. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला हा सगळ्यात कमी स्कोअर आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम इंग्लंडविरुद्ध दोनवेळा 30 रनवर ऑल आऊट झाली. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर 35 आणि 36 रनवर ऑल आऊट होण्याचाही रेकॉर्ड आहे. भारताचा 36 रनवर ऑल आऊट करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 1902 साली 36 रनवरच ऑल आऊट झाला होता. मागच्याच वर्षी आयर्लंडच्या टीमचा इंग्लंडविरुद्ध 38 रनवर ऑल आऊट झाली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी स्कोअरवर ऑल आऊट होण्याच्या यादीत भारतीय टीम सातव्या क्रमांकावर आहे. पण या शतकातली एवढ्या कमी स्कोअरवर ऑल आऊट होणारी भारतीय टीम पहिलीच आहे. टेस्ट क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदाच टीमच्या सगळ्या 11 खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या