IND vs AUS : लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरचा 'टीम इंडिया'वर निशाणा

IND vs AUS : लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरचा 'टीम इंडिया'वर निशाणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs Australia) पहिले दोन दिवस चांगला खेळ केल्यानंतर तिसऱ्या दिवशी लाजीरवाणी कामगिरी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव फक्त 36 रनवर संपुष्टात आला. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही भारतीय टीमच्या या कामगिरीवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs Australia) पहिले दोन दिवस चांगला खेळ केल्यानंतर तिसऱ्या दिवशी लाजीरवाणी कामगिरी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव फक्त 36 रनवर संपुष्टात आला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निच्चांकी स्कोअर आहे. या पराभवानंतर टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही भारतीय टीमच्या या कामगिरीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ शेयर केला आहे.

शोएब अख्तरने केलं टीम इंडियाला ट्रोल

शोएब अख्तरने ऍडलेडमधल्या दारूण पराभवानंतर भारतीय टीमला ट्रोल केलं आहे. शोएब अख्तर त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला, 'मी सकाळी उठलो तेव्हा मला वाटलं भारताने 369 रन केले, पण नीट बघितलं तेव्हा कळलं की त्यांच्या 36 रनवर 9 विकेट गेल्या आहेत. भारत एवढी मजबूत टीम आहे, त्यांची बॅटिंगही एवढी मजबूत आहे, त्यांच्यासोबत हे काय झालं?'

'भारताने आज गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाने ते काय करू शकतात, हे दाखवून दिलं. भारताने तर हद्द पार केली. पाकिस्तान तरी 53 रनवर ऑल आऊट झाली होती, पण भारताने आम्हालाही पिछाडीवर टाकलं. हेजलवूडने भारताला असे धक्के दिले, ज्याला फक्त पराभव म्हणता येणार नाही. त्याने भारताला लोळवून मारलं,' अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली.

'या टेस्ट मॅचनंतर टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याबाबतही बोललं जाऊ शकतं. अशा मॅचनंतर टीम बदलली जाऊ शकते. आता तुम्हाला विचार करावा लागेल. तुम्ही तुम्हाला पाहिजे ती टीम निवडा, पण स्कोअर तर बनवा. 0,0, 2,2,4 हे काही ल्युडो नाही. इन्स्टाग्रामवर क्रिकेट सुरू नाहीये, मैदानातल्या क्रिकेटवर लक्ष द्या', असा सल्लाही शोएबने टीम इंडियाला दिला आहे.

Published by: Shreyas
First published: December 20, 2020, 10:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या