Home /News /sport /

IND vs AUS : पुजारा-मयंकने मैदानात घेतला आक्षेप, वॉर्न-बॉर्डर झाले नाराज

IND vs AUS : पुजारा-मयंकने मैदानात घेतला आक्षेप, वॉर्न-बॉर्डर झाले नाराज

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली पहिली टेस्ट सुरू झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर शेन वॉर्न (Shane Warne) आणि एलन बॉर्डर (Alan Border) अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यावर चांगलेच नाराज झाले.

पुढे वाचा ...
    ऍडलेड, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दुसऱ्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यालाही फक्त 17 रनच करता आले. दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर शेन वॉर्न (Shane Warne) आणि एलन बॉर्डर (Alan Border) अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यावर चांगलेच नाराज झाले. चेतेश्वर पुजारा आणि मयंक अगरवाल यांना बॅटिंग करत असताना बॉलरच्या मागे असलेल्या साईट स्क्रीनमुळे त्रास होत होता. या दोघांनी अनेक वेळा साईट स्क्रीन नीट केली. साईट स्क्रीन मोठी असली तरी त्याच्याबाजूला काळ्या रंगाचा एक बॉक्स ठेवण्यात आला होता, ज्यामुळे मयंक आणि पुजाराला त्रास होत होता. यामुळे काही वेळ फुकट गेला, ज्यामुळे वॉर्न आणि बॉर्डर नाराज झाले. या दोघांनी पुजारा आणि मयंकची रणनीती चुकीचं असल्याचं सांगितलं. शेन वॉर्न कॉमेंट्री करताना म्हणाला, 'साईट स्क्रीन खूप मोठी आहे, तुम्ही तिला काय ठीक करत आहात? नक्की हे चाललंय काय? या गोष्टी योग्य नाहीत.' यावर बॉर्डर यांनी वॉर्नच्या मताशी सहमती दर्शवली. 'तुम्हाला बॅटिंगवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. मी खेळत असताना कधीही साईट स्क्रीनकडे लक्ष दिलं नाही,' असं बॉर्डर म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या