IND vs AUS : 36 रनवर ऑल आऊट, पाकिस्तानी खेळाडूंनी टीम इंडियाला खिजवलं

IND vs AUS : 36 रनवर ऑल आऊट, पाकिस्तानी खेळाडूंनी टीम इंडियाला खिजवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला हा सगळ्यात निच्चांकी स्कोअर होता. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • Share this:

ऍडलेड, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला हा सगळ्यात निच्चांकी स्कोअर होता. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टीम इंडियासाठी हा दिवस अतिशय वाईट होता, असं पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू जावेद मियांदाद (Javed Miandad) म्हणाले. 'ऑस्ट्रेलियाने टाकलेले काही बॉल खेळण्यासाठी अशक्य होते. पण भारतीय खेळाडूंनी अजिबात प्रतिकार केला नाही, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. 36 रनवर ऑल आऊट होण्यासारखी भारतीय टीम नाही,' अशी प्रतिक्रिया मियांदादनी दिली.

शाहिद आफ्रिदी

तर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यानेही ट्विट करून भारतीय टीमच्या कामगिरीची समीक्षा केली. यापुढे विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये पुनरागमन करणं कठीण आहे, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.

राशिद लतीफ

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ (Rashid Latif) याला पाकिस्तानी टीमने 2002 साली केलेली कामगिरी आठवली. पाकिस्तानची टीम अशाच प्रकारे 2002 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबु धाबीमध्ये 59 आणि 53 रनवर ऑल आऊट झाली होती, अशी आठवण लतीफने करून दिली.

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही टीम इंडियाच्या कामगिरीवर निशाणा साधला. शोएब अख्तर त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला, 'मी सकाळी उठलो तेव्हा मला वाटलं भारताने 369 रन केले, पण नीट बघितलं तेव्हा कळलं की त्यांच्या 36 रनवर 9 विकेट गेल्या आहेत. भारत एवढी मजबूत टीम आहे, त्यांची बॅटिंगही एवढी मजबूत आहे, त्यांच्यासोबत हे काय झालं?'

'भारताने आज गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाने ते काय करू शकतात, हे दाखवून दिलं. भारताने तर हद्द पार केली. पाकिस्तान तरी 53 रनवर ऑल आऊट झाली होती, पण भारताने आम्हालाही पिछाडीवर टाकलं. हेजलवूडने भारताला असे धक्के दिले, ज्याला फक्त पराभव म्हणता येणार नाही. त्याने भारताला लोळवून मारलं,' अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली.

'या टेस्ट मॅचनंतर टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याबाबतही बोललं जाऊ शकतं. अशा मॅचनंतर टीम बदलली जाऊ शकते. आता तुम्हाला विचार करावा लागेल. तुम्ही तुम्हाला पाहिजे ती टीम निवडा, पण स्कोअर तर बनवा. 0,0, 2,2,4 हे काही ल्युडो नाही. इन्स्टाग्रामवर क्रिकेट सुरू नाहीये, मैदानातल्या क्रिकेटवर लक्ष द्या', असा सल्लाही शोएबने टीम इंडियाला दिला आहे.

Published by: Shreyas
First published: December 20, 2020, 4:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading