Home /News /sport /

IND vs AUS : टीम इंडियाने लाज घालवली, निच्चांकी स्कोअरवर ऑल आऊट

IND vs AUS : टीम इंडियाने लाज घालवली, निच्चांकी स्कोअरवर ऑल आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय टीमने (India vs Australia) लाज घालवणारी कामगिरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला आहे.

    ऍडलेड, 19 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय टीमने (India vs Australia) लाज घालवणारी कामगिरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला आहे. टेस्ट क्रिकेटमधली भारताची ही निच्चांकी धावसंख्या आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध 1974 साली भारताचा 42 रनवर ऑल आऊट झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने 5 तर पॅट कमिन्सने 4 विकेट घेतल्या. भारताकडून चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन शून्य रनवर आऊट झाले. तर पृथ्वी शॉ 4, मयंक अगरवाल 9, जसप्रीत बुमराह 2, विराट कोहली 4, हनुमा विहारी 8 रन, ऋद्धीमान साहा 4 रनवर आऊट झाले. तर मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाला. या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दोन आकडी संख्या गाठता आली नाही. भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 रनचं आव्हान मिळालं आहे.

    टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने पहिल्या इनिंगमध्ये 244 रन केले यानंतर भारताच्या बॉलरनी दिमाखदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 191 रनवर ऑल आऊट केला, त्यामुळे भारताला 53 रनची आघाडी मिळाली.

    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या