मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : पहिल्या टेस्टआधी कपिल देव यांनी भारतीय बॉलरना दिला धोक्याचा इशारा

IND vs AUS : पहिल्या टेस्टआधी कपिल देव यांनी भारतीय बॉलरना दिला धोक्याचा इशारा

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरूवार (17 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. या मॅचआधी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय बॉलरना धोक्याचा इशारा दिला आहे.

    कोलकाता, 16 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरूवार (17 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. या मॅचआधी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय बॉलरना धोक्याचा इशारा दिला आहे. उसळी मारणाऱ्या खेळपट्ट्या बघून उत्तेजित होऊ नका, आपली ताकदीने बॉलिंग करा, असं कपिल देव म्हणाले आहे. इशांत शर्माच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी फास्ट बॉलिंगची जबाबदारी स्वीकारतील. तर टीममध्ये तिसरा पर्याय म्हणून उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी आहे. पण कपिल देव यांच्या मते भारतीय बॉलरना अजूनही ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर बॉलिंग करण्याचा अनुभव नाही. 'भारतीय बॉलरना ऑस्ट्रेलियात बॉलिंग करण्याचा अनुभव नाही, अनेकवेळा उसळी मारणाऱ्या खेळपट्ट्या बघून बॉलर उत्तेजित होतात, पण आपण आपल्या ताकदीवर बॉलिंग केली पाहिजे, हे त्यांना समजलं पाहिजे. आपल्याकडे शानदार फास्ट बॉलर आहेत, पण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू तिथल्या परिस्थितीला आपल्या बॉलरपेक्षा चांगल्या पद्धतीने समजतात,' अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी कोलकात्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात दिली. पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पगडा भारी असल्याचंही कपिल देव म्हणाले. 'ऑस्ट्रेलिया स्वत:च्या घरात खेळत आहे. जर भारत गुलाबी बॉलने भारतात खेळत असता, तर भारताच्या विजायची शक्यता 80 टक्के असती. ऑस्ट्रेलियाच्या टीमकडे गुलाबी बॉलने खेळण्याचा अनुभव जास्त आहे. भारताने फक्त एकच सामना या बॉलने खेळला आहे,' असं कपिल देव यांनी सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या