IND vs AUS : बुमराह अशी चूक कशी करू शकतो?, भारताला किंमत मोजावी लागणार?

IND vs AUS : बुमराह अशी चूक कशी करू शकतो?, भारताला किंमत मोजावी लागणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs Australia) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने मोठी चूक केली आहे. बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या बुमराहने मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याचा सोपा कॅच सोडला.

  • Share this:

ऍडलेड, 18 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 244 रनवर ऑल आऊट झाला. यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने भेदक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. बुमराहने मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही ओपनरना एलबीडब्ल्यू केलं. भारताला सुरुवातीच्या दोन विकेट मिळवून देणाऱ्या बुमराहने नंतर मात्र मोठी चूक केली. फाईन लेगला फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या बुमराहने मार्नस लाबुशेनचा कॅच सोडला.

इनिंगच्या 18 व्या ओव्हरचा पाचवा बॉल मोहम्मद शमीने बाऊन्सर टाकला. या बॉलवर लाबुशेनने पूल शॉट मारला, पण बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या बुमराहला हा कॅच पकडता आला नाही आणि बॉल बाऊंड्रीच्या दिशेने गेला. बुमराहने कॅच सोडला तेव्हा लाबुशेन 12 रनवर खेळत होता.

बुमराहने सोडलेला हा कॅच भारताला महागात पडू शकतो. ही सीरिज सुरू होण्याच्या आधीच सचिन तेंडुलकरने मार्नस लाबुशेन भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो, अशी भीती वर्तवली होती. मागच्यावर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लाबुशेननने टेस्ट क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. 14 टेस्ट मॅचमध्ये त्याने 63.43 च्या सरासरीने 1,459 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. लाबुशेनचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर 215 एवढा आहे.

Published by: Shreyas
First published: December 18, 2020, 12:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या