Home /News /sport /

IND vs AUS : चाहते म्हणतात, बुमराह शॉपेक्षा चांगला बॅट्समन, गावसकरांनीही केलं कौतुक

IND vs AUS : चाहते म्हणतात, बुमराह शॉपेक्षा चांगला बॅट्समन, गावसकरांनीही केलं कौतुक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने (India vs Australia) 53 रनची महत्त्वाची आघाडी घेतली. यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नाईट वॉचमन म्हणून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं.

पुढे वाचा ...
    ऍडलेड, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने (India vs Australia) 53 रनची महत्त्वाची आघाडी घेतली. भारतीय बॉलरनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 191 रनवर ऑल आऊट केला. दुसऱ्या दिवशी अखेरच्या काही ओव्हरमध्ये भारताला बॅटिंग मिळाली, पण पृथ्वी शॉ पुन्हा एकदा लवकर आऊट झाला, यानंतर कर्णधार विराट कोहली याने नाईट वॉचमन म्हणून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. बुमराहने नाईट वॉचमनची भूमिका प्रभावीपणे पार पाडली आणि मयंक अगरवालसोबत भारताला आणखी धक्के लागू दिले नाही. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी बुमराहचं कौतुक केलं. बुमराह जेव्हा नाईट वॉचमन म्हणून मैदानात उतरला, तेव्हा अनेकांनी विराटच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. अनेकांनी अश्विनला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्याची गरज असल्याचं मत मांडलं, पण बुमराहने सगळ्यांना चुकीचं ठरवलं. त्याने मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जॉस हेजलवूड यांच्या बॉलिंगचा सामना केला. बाहेर जाणाऱ्या बॉलला बुमराहने सोडून दिलं आणि तो स्टम्पवरच्या बॉलवर एखाद्या बॅट्समनप्रमाणेच खेळला. यानंतर अनेकांनी बुमराहचं बॅटिंग तंत्र पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पेक्षा चांगलं असल्याची प्रतिक्रिया दिली. पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झालेला पृथ्वी शॉ दुसऱ्या इनिंगमध्ये 4 रनवर माघारी गेला. दोन्ही इनिंगमध्ये पृथ्वी शॉ बोल्ड झाला, यानंतर आता उरलेल्या सीरिजमध्ये त्याचं खेळणं कठीण झालं आहे. गावसकरांनी केलं बुमराहचं कौतुक बुमराहला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी मजेशीर कमेंट केली. 30-40 वर्षांनंतर बुमराह आपल्या नातवंडांना मी भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केली, असं सांगेल, असं गावसकर म्हणाले. बुमराहने ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतकही झळकावलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या