Home /News /sport /

Ind vs Aus Day 3 Live : पहिल्या टेस्टमध्ये भारताची लाजीरवाणी कामगिरी, 36 रनवर डाव संपुष्टात

Ind vs Aus Day 3 Live : पहिल्या टेस्टमध्ये भारताची लाजीरवाणी कामगिरी, 36 रनवर डाव संपुष्टात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची (India vs Australia) दयनीय अवस्था झाली आहे. 36 रनवरच भारतीय टीम ऑल आऊट झाली आहे.

    ऍडलेड, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची (India vs Australia) दयनीय अवस्था झाली आहे. 36 रनवर भारताचा डाव संपुष्टात आला. मोहम्मद शमीच्या मनगटाला बॉल लागल्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही.  दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने जसप्रीत बुमराहला 2 रनवर, चेतेश्वर पुजाराला शून्य रनवर, अजिंक्य रहाणे शून्य रनवर आणि विराट कोहली चार रनवर आऊट झाला. तर मयंक अगरवाल 9, हनुमा विहारी 8 रन, ऋद्धीमान साहा 4 रनवर आऊट झाले. त्याआधी पहिल्या दिवशी भारताने पृथ्वी शॉची विकेट गमावली होती. पॅट कमिन्सने 4 तर जॉश हेजलवूडने 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा दुसऱ्या इनिंगचा स्कोअर 9-1 असा झाला होता. मॅचमध्ये कालच्या एका दिवसात तब्बल 15 विकेट गेल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये 244 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा 191 रनवर ऑल आऊट केला, ज्यामुळे भारताला 53 रनची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. अश्विनने (R.Ashwin) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर उमेश यादवला 3 आणि जसप्रीत बुमराहला 2 विकेट मिळाल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही टेस्ट मॅच संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडून येणार आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे टीमचं नेतृत्व करेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या