IND vs AUS Day 2 : पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे महत्त्वाची आघाडी

IND vs AUS Day 2 : पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे महत्त्वाची आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 9-1 असा झाला आहे.

  • Share this:

 ऍडलेड, 18 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 9-1 असा झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झालेला पृथ्वी शॉ दुसऱ्या इनिंगमध्ये 4 रन करून आऊट झाला. दिवसाअखेरीस मयंक अगरवाल 5 रनवर आणि जसप्रीत बुमराह शून्य रनवर खेळत आहे. भारताकडे आता 62 रनची आघाडी आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या इनिंगमध्ये 191 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे या टेस्ट मॅचमध्ये भारताला 53 रनची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. भारताकडून आर. अश्विन (R Ashwin) याने 4 विकेट घेतल्या, तर उमेश यादव (Umesh Yadav) ला 3 आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला 2 विकेट मिळाल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने 73 रनची खेळी केली. भारतीय बॉलरनी या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली असली, तरी ऑस्ट्रेलियाच्या खालच्या बॅट्समनना आऊट करण्यात त्यांना संघर्ष करावा लागला. 111 रनवर ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट गेल्या असतानाही त्यांनी 191 रनपर्यंत मजल मारली.

भारताच्या खराब फिल्डिंगचा फायदाही ऑस्ट्रेलियाला झाला. मार्नस लाबुशेन याचे दोन कॅच जसप्रीत बुमराह आणि पृथ्वी शॉ यांनी सोडले, तर टीम पेन याचा एक कॅच मयंक अगरवाल याने सोडला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताची बॅटिंग गडगडली. 244 रनवर भारताचा ऑलआऊट झाला आहे. दिवसाची सुरुवात भारताने 233-6 अशी केली होती, पण 11 रनवरच भारताने उरलेल्या 4 विकेट गमावल्या. अश्विन 15 रनवर, साहा 9 रनवर, उमेश यादव 6 रनवर आणि मोहम्मद शमी शून्य रनवर माघारी गेले.

त्याआधी पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने 74 रन, अजिंक्य रहाणे 42 रन आणि चेतेश्वर पुजाराने 43 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्सला 3 आणि जॉश हेजलवूड नॅथन लायन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पण ओपनर पृथ्वी शॉ दुसऱ्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली ही शेवटची मॅच आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे ही टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट भारतात परतणार आहे.

बुमराह-शमी ठरणार ट्रम्प कार्ड

बॉलिंगमध्ये बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) ही भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतात. गुलाबी बॉल आणि डे-नाईट टेस्ट यामुळे भारताच्या या दोन्ही फास्ट बॉलरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवण्याची क्षमता आहे.

Published by: Shreyas
First published: December 18, 2020, 8:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या