Home /News /sport /

IND vs AUS Day 1 : विराटच्या विकेटनंतर भारताची पडझड, दिवसाअखेरीस गमावल्या 6 विकेट

IND vs AUS Day 1 : विराटच्या विकेटनंतर भारताची पडझड, दिवसाअखेरीस गमावल्या 6 विकेट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताने (India vs Australia) 233-6 पर्यंत मजल मारली आहे. चहापानानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवतील असं वाटत होतं

पुढे वाचा ...
    ऍडलेड, 17 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताने (India vs Australia) 233-6 पर्यंत मजल मारली आहे. चहापानानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवतील असं वाटत होतं, पण रहाणेने केलेल्या एका चुकीमुळे विराट कोहली रनआऊट झाला, यानंतर भारताच्या पडझडीला सुरुवात झाली. विराट कोहली 74 रनवर आऊट झाला, तर अजिंक्य रहाणे 42 रनवर माघारी परतला. हनुमा विहारी 25 बॉलमध्ये 16 रन करून आऊट झाला. दिवसाअखेरीस ऋद्धीमान साहा 9 रनवर आणि आर.अश्विन 15 रनवर नाबाद खेळत आहे. दिवसभरात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 विकेट तर हेजलवूड, कमिन्स आणि लायनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. शेवटच्या सत्रात भारताने एकूण तीन विकेट गमावल्या. लंचनंतर भारताने चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. लायनने पुजाराला 43 रनवर आऊट केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने टिच्चून बॉलिंग केली. लंचपर्यंत भारताचा स्कोअर 41-2 एवढा झाला आहे. चेतेश्वर पुजारा 17 रनवर नाबाद, तर विराट कोहली 5 रनवर नाबाद आहे. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मॅचच्या दुसऱ्याच बॉलला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) शून्य रनवर आऊट झाला. मिचेल स्टार्कने शॉला बोल्ड केलं. शॉची विकेट गेल्यानंतर मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी 32 रनची पार्टनरशीप केली, पण मयंक अगरवालला पॅट कमिन्सने माघारी धाडलं. शॉ आणि अगरवाल हे दोघंही बोल्ड झाले. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीन (Cameron Green) पदार्पण करत आहे. तर भारताने त्यांच्या अंतिम 11 खेळाडूंची घोषणा कालच केली आहे. परदेशामध्ये भारताचा हा पहिलाच डे-नाईट सामना आहे. त्यामुळे गुलाबी बॉलने खेळण्याचं मोठं आव्हान भारतीय टीमपुढे असणार आहे. याआधी भारताने कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात बांगलादेशविरुद्ध डे-नाईट टेस्ट खेळली होती. या मॅचमध्ये भारताचा सहज विजय झाला होता. ऍडलेडमधली ही टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडून येणार आहे. भारतीय टीम विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन टीम जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेजलवूड
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या