Home /News /sport /

IND vs AUS : पुजाराने 148 बॉलनंतर मारली फोर, आऊट होताना झाला गोंधळ

IND vs AUS : पुजाराने 148 बॉलनंतर मारली फोर, आऊट होताना झाला गोंधळ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने (India vs Australia) दोन विकेट लवकर गमावल्या, यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने विराट कोहली (Virat Kohli) च्या मदतीने भारताच्या इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला.

    ऍडलेड, 17 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने (India vs Australia) दोन विकेट लवकर गमावल्या, यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने विराट कोहली (Virat Kohli) च्या मदतीने भारताच्या इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला. पुजाराने 160 बॉल खेळले, पण त्याला अर्धशतक करता आलं नाही. 43 रन करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. पुजाराने हळू बॅटिंग केली असली, तरी त्याने भारताला दबावातून बाहेर काढलं. पुजाराने मॅचच्या तिसऱ्याच बॉलवर मैदानात पाऊल टाकलं होतं, कारण पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मॅचच्या दुसऱ्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता. मिचेल स्टार्कच्या इनस्विंगमुळे शॉ बोल्ड झाला. यानंतर पुजारा बॅटिंगला आला, त्याने स्टार्क, हेजलवूड आणि कमिन्स यांच्या बॉलिंगचा धीटाने सामना केला. पुजाराने मयंक अगरवालसोबत 108 बॉलमध्ये 32 रनची पार्टनरशीप केली. मयंकची विकेट गेल्यानंतर पुजाराने विराटसोबत 191 बॉलमध्ये 68 रनची पार्टनरशीप केली. पुजाराने 147 बॉल खेळल्यानंतर आपली पहिली फोर मारली. नॅथन लायनच्या बॉलिंगवर बॅकफूट कव्हर ड्राईव्हने पुजाराने पहिली फोर मारली. यानंतर पुढच्याच बॉलला पुजाराने डीप स्क्वेअर लेगला फोर मारली. पण पुढच्या काही बॉलमध्येच पुजाराची विकेट गेली. पुजाराच्या विकेटदरम्यान गोंधळ पुजाराच्या विकेटवेळी मैदानात गोंधळ पाहायला मिळाला. लायनने टाकलेल्या 50 व्या ओव्हरचा चौथा बॉल पुजाराच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागला आणि शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या लाबुशेनने कॅच पकडला. अंपायर ब्रुक्स ऑक्सनफर्ड यांनी पुजाराला नॉट आऊट दिलं. कॅच पकडल्यानंतर पुजारा ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाऊ लागला, पण अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर तो परत क्रीजमध्ये आला. यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेतला आणि थर्ड अंपायरने पुजाराला आऊट दिलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या