IND vs AUS : चेतेश्वर पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू

IND vs AUS : चेतेश्वर पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू

भारताचा दिग्गज बॅट्समन चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) नवा विक्रम केला आहे.

  • Share this:

ऍडलेड, 18 डिसेंबर : भारताचा दिग्गज बॅट्समन चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) नवा विक्रम केला आहे. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजाराने 160 बॉल खेळून 43 रन केले. याचसोबत त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला मागे टाकलं आहे.

चेतेश्वर पुजारा मागच्या दशकात (1 जानेवारी 2011 पासून) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बॉल खेळणारा खेळाडू बनला आहे. पुजाराने 28 इनिंगमध्ये 3,609 बॉलचा सामना केला आहे. तर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 35 इनिंगमध्ये 3,115 बॉल खेळले. इंग्लंडचा माजी खेळाडू एलिस्टर कूकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3,274 बॉल तर एबी डिव्हिलियर्सने 2,300 बॉल खेळले.

जो रूटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 28 इनिंगमध्ये 3,607 बॉलचा सामना केला. ऍडलेड टेस्टमध्ये पुजाराचं अर्धशतक हुकलं. नॅथन लायनने त्याला इनिंगच्या 50व्या ओव्हरला आऊट केलं. मार्नस लाबुशेनने पुजाराचा सोपा कॅच पकडला.

चेतेश्वर पुजाराने मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती, यामुळे भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला होता. यावेळीही पुजारा पहिल्या इनिंगमध्ये टिच्चून उभा राहिला. त्याने बॅटिंग करताना लागोपाठ 34 बॉलवर एकही रन केली नाही. या इनिंगमध्ये पुजाराने एक फोर मारली, तीदेखील 148 बॉल खेळल्यावर.

'विकेट वाचवून खेळण्याची त्यावेळी गरज होती, कारण बॉल स्विंग होत होता. टेस्ट क्रिकेटसाठी हा शानदार दिवस होता. या रणनीतीवर मला अजिबात दु:ख नाही. शॉट्स खेळताना आम्ही जास्त विकेट गमावल्या नाहीत,' असं पुजारा पहिला दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला.

Published by: Shreyas
First published: December 18, 2020, 2:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading