IND vs AUS : पहिल्या टेस्टमध्ये हे 11 खेळाडू मैदानात उतरणार, BCCIची घोषणा

IND vs AUS : पहिल्या टेस्टमध्ये हे 11 खेळाडू मैदानात उतरणार, BCCIची घोषणा

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरूवार (17 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. बीसीसीआय (BCCI) ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या टेस्ट मॅचसाठीच्या टीमची घोषणा केली आहे.

  • Share this:

ऍडलेड, 16 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरूवार (17 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानात होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येणार आहे. या मॅचसाठी मैदानात उतरणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय (BCCI) ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून टीमची घोषणा केली आहे.

ओपनिंगला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) का शुभमन गिल (Shubhaman Gill), तसंच विकेट कीपर म्हणून ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) का ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना संधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात होता. पण विराट कोहलीने पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना संधी दिली आहे. फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर असेल, तर अश्विन हा एकमेव स्पिनर खेळणार आहे. शुभमन गिल हा 12वा खेळाडू असेल.

परदेशामधली भारताची ही पहिलीची डे-नाईट मॅच असणार आहे. याआधी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात गुलाबी बॉलने डे-नाईट मॅच खेळवण्यात आली होती. त्या मॅचमध्ये भारताचा सहज विजय झाला होता.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

Published by: Shreyas
First published: December 16, 2020, 1:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या