Home /News /sport /

IND vs AUS : पहिल्या टेस्टमध्ये भारताचा दारूण पराभव, बॅट्समनची लाजीरवाणी कामगिरी

IND vs AUS : पहिल्या टेस्टमध्ये भारताचा दारूण पराभव, बॅट्समनची लाजीरवाणी कामगिरी

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा दणदणीत विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या 90 रनच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 21 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून केला.

    ऍडलेड, 19 डिसेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा दणदणीत विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या 90 रनच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 21 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून केला. जो बर्न्स 51 रनवर आणि स्टीव्ह स्मिथ 1 रनवर नाबाद राहिला. मॅथ्यू वेड 33 रन करून आणि मार्नस लाबुशेन 6 रनवर आऊट झाले. भारताकडून अश्विनने एक विकेट घेतली, तर मॅथ्यू वेड रन आऊट झाला. त्याआधी तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 36 रनवर संपुष्टात आला. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला हा सगळ्यात निचांकी स्कोअर आहे. एकाही भारतीय खेळाडूला या इनिंगमध्ये दोन आकडी रन करता आले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने 5 विकेट आणि पॅट कमिन्सने 4 विकेट घेतल्या. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने पहिल्या इनिंगमध्ये 244 रन केले, यानंतर भारतीय बॉलरनी दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 191 रनवर ऑल आऊट केला, त्यामुळे भारताला 53 रनची आघाडी मिळाली, पण या आघाडीचा भारतीय टीमला फायदा घेता आला नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची ही या दौऱ्यातली शेवटची मॅच होती. या मॅचनंतर आता विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट हा दौरा अर्धवट सोडून भारतात येणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या