Home /News /sport /

IND vs AUS : ...म्हणून बुमराहशिवाय पहिल्या टी-20 मध्ये भारतीय टीम मैदानात

IND vs AUS : ...म्हणून बुमराहशिवाय पहिल्या टी-20 मध्ये भारतीय टीम मैदानात

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आता टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये भारतीय टीम जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) शिवाय मैदानात उतरली आहे.

    कॅनबेरा, 4 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आता टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्यानंतर भारतीय टीम टी-20 सीरिजमध्ये बदला घेण्यासाठी मैदानात उतरत आहे. वनडेनंतरच्या या टी-20 सीरिजमध्ये भारतीय टीमने बरेच बदल केले आहेत. श्रेयस अय्यरच्या ऐवजी मनिष पांडेला, तसंच शुभमन गिलऐवजी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूरऐवजी दीपक चहर टीममध्ये आला आहे. या मॅचसाठी जसप्रीत बुमराह भारतीय टीममध्ये नाही. बुमराहऐवजी तिसऱ्या वनडेमध्ये न खेळलेला मोहम्मद शमीने टीममध्ये पुनरागमन केलं आहे. बुमराह टीममध्ये का नाही? जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी-20 क्रिकेटमधूनच उदयाला आला. टी-20 स्पेशलिस्ट असलेला बुमराह भारतीय टीममध्ये नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण बुमराह टीममध्ये नसण्याचं कारण समोर आलं आहे. जसप्रीत बुमराह हा आयपीएलपासून लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. यानंतर तिन्ही वनडेमध्येही तो खेळला होता, तसंच चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये बुमराह भारताचं महत्त्वाचं अस्त्र असणार आहे. त्यामुळे शरिरावर ताण येऊ नये म्हणून बुमराहला पहिल्या टी-20 मध्ये विश्रांती देण्याचा निर्णय टीम प्रशासनाने घेतला आहे. जसप्रीत बुमराहने 49 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 6.67 च्या इकोनॉमी रेटने 59 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये बुमराह हा भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूही आहे. भारतीय टीम शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, टी नटराजन
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या