Home /News /sport /

IND vs AUS : पहिल्या टी-20 मध्ये विराट या खेळाडूंना संधी देणार!

IND vs AUS : पहिल्या टी-20 मध्ये विराट या खेळाडूंना संधी देणार!

वनडे सीरिज गमावल्यानंतर भारतीय टीम टी-20 सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia)चा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.

    कॅनबेरा, 4 सप्टेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली पहिली टी-20 मॅच आज खेळवण्यात येणार आहे. वनडे सीरिज 2-1 ने गमावल्यानंतर भारतीय टीम या पराभवाचा बदला टी-20 सीरिजमध्ये घेण्यासाठी मैदानात उतरेल. पहिल्या दोन वनडे मॅच गमावल्यानंतर तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा 13 रनने विजय झाला. 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये भारतीय टीमची कमजोरी वारंवार समोर येत असली तरी टी-20 साठीची भारतीय टीम बरीच संतुलित आहे. कोरोना व्हायरसच्याआधी भारताने न्यूझीलंडचा 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये पराभव केला होता. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा यॉर्कर स्पेशलिस्ट टी नटराजन या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. तिसऱ्या वनडेमधून नटराजन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने प्रभावितही केलं होतं. तर दुसरीकडे वनडे सीरिजमध्ये पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करणारा केएल राहुल शिखर धवनसोबत ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धही त्याने इनिंगची सुरुवात केली होती. आयपीएलचाच फॉर्म धवन आणि राहुल कायम ठेवतील, अशी विराटला अपेक्षा असेल. आयपीएलमध्ये केएल राहुलला सर्वाधिक रन केल्यामुळे ऑरेंज कॅप मिळाली होती. राहुलने यंदाच्या आयपीएलमध्ये 670 रन केले होते, तर शिखर धवनने 618 रन केले होते. कर्णधार विराट कोहलीही वनडे सीरिजवेळी फॉर्ममध्ये दिसला. पण श्रेयस अय्यरला चांगली सुरुवात मिळूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताची संभाव्य टीम शिखर धवन, केएल राहुल (विकेट कीपर), विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, दीपक चहर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, टी नटराजन ऑस्ट्रेलियाची संभाव्य टीम डीआरसी शॉर्ट, एरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), कॅमरून ग्रीन, मिचेल स्टार्क, जॉस हेजलवूड, एश्टन एगर, एडम झम्पा, सीन एबॉट
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या