IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर विराटने घेतली खेळाडूंची शाळा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर विराटने घेतली खेळाडूंची शाळा

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याची सुरुवात खराब झाली. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय टीम (Team India)चा 66 रनने पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाराज झाला आणि त्याने मैदानामध्येच खेळाडूंची शाळा घेतली.

  • Share this:

27 नोव्हेंबर, सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याची सुरुवात खराब झाली. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय टीम (Team India)चा 66 रनने पराभव झाला. भारताच्या खराब बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 374 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 ओव्हरमध्ये फक्त 308 रनच करता आले, त्यामुळे भारत तीन मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने पिछाडीवर गेला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाराज झाला आणि त्याने मैदानामध्येच खेळाडूंची शाळा घेतली.

मॅचनंतर विराटने टीमच्या खेळाडूंबाबतच प्रश्न उपस्थित केले. '25 ओव्हरनंतर भारतीय खेळाडूंची शारिरिक भाषा खूपच निराशाजनक होती. आम्हाला तयारी करायला पूर्ण वेळ मिळाला होता. पराभवाचं कोणतंही कारण देऊ इच्छित नाही, पण आम्ही बऱ्याच काळानंतर वनडे क्रिकेट खेळत आहोत. याआधी आम्ही टी-20 क्रिकेट खेळत होतो. चांगल्या टीमविरुद्ध तुम्ही मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाहीत, तर त्याचे परिणाम भोगावे लागतात,' असं विराट म्हणाला.

सिडनी वनडेमध्ये शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सोप्या संधी सोडल्या, तर खेळाडूंची मैदानातली फिल्डिंगही खराब झाली. मयंक अग्रवाल आणि विराट कोहली यांनीही चुका केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठा स्कोअर उभारला.

'आम्हाला सहाव्या बॉलरची कमी जाणवली. हार्दिक पांड्या बॉलिंगसाठी फिट नव्हता आणि आमच्याकडे ऑलराऊंडरचा दुसरा पर्यायही नव्हता. स्टॉयनिस आणि मॅक्सवेलसारखे खेळाडू आमच्याकडे नाहीत. बॅटिंग करताना आम्ही सकारात्मक होतो. बॅट्समनची कामगिरी चांगली झाली,' असं वक्तव्य विराटने केलं.

Published by: Shreyas
First published: November 27, 2020, 7:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading