मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : स्टीव्ह स्मिथने केली सेहवागची बोलती बंद, बॅटने दिलं उत्तर

IND vs AUS : स्टीव्ह स्मिथने केली सेहवागची बोलती बंद, बॅटने दिलं उत्तर

भारताविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा 66 रनने विजय झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांनी केलेल्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 374 रन केले.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 27 नोव्हेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा 66 रनने विजय झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांनी केलेल्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 374 रन केले. फिंचने 124 बॉलमध्ये 114 तर स्मिथने 66 बॉलमध्येच 105 रनची खेळी केली. या कामगिरीबद्दल स्मिथला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. स्मिथला टेस्ट क्रिकेटमधला सर्वोत्तम बॅट्समन मानलं जात असलं, तरी वनडे क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापेक्षा कमी आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने याचवरून स्मिथवर निशाणा साधला होता. माझा टेस्टचा स्ट्राईक रेट आणि स्मिथचा वनडेचा स्ट्राईक रेट सारखा असल्याचा टोला सेहवागने हाणला होता. सेहवागची ही टीका स्मिथच्या अनेक चाहत्यांना रुचली नव्हती. पण स्मिथने त्याच्या बॅटनेच सेहवागला उत्तर दिलं.

स्मिथचं जलद शतक

स्मिथने सिडनीमध्ये झालेल्या या वनडेमध्ये त्याच्या कारकिर्दीतलं सगळ्यात जलद शतक पूर्ण केलं. 61 बॉलमध्येच स्मिथने 100 रन गाठले. ऑस्ट्रेलियाकडून सगळ्यात जलद शतक करण्याच्या बाबतीत स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी सगळ्यात जलद 51 बॉलमध्ये वनडे शतक ठोकलं. तर फॉकनरने 57 बॉलमध्येच शतक केलं होतं.

8 महिन्यानंतर स्मिथ पहिली वनडे मॅच खेळला. 20 बॉलमध्ये 19 रनची हळू सुरूवात केल्यानंतर स्मिथने गियर बदलला आणि 36 बॉलमध्ये अर्धशतक केलं, यानंतर पुढच्या 35 बॉलमध्ये त्याने शतक गाठलं. स्मिथने त्याच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 4 सिक्स लगावले आणि 159.09 स्ट्राईक रेटने रन केले.

First published: