मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS 3rd Test : चांगल्या सुरूवातीनंतर रोहित-गिल पुन्हा माघारी, भारताला टेस्ट वाचवण्याचं आव्हान

IND vs AUS 3rd Test : चांगल्या सुरूवातीनंतर रोहित-गिल पुन्हा माघारी, भारताला टेस्ट वाचवण्याचं आव्हान

सिडनीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs Australia) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी पुन्हा एकदा भारताला चांगली सुरूवात करून दिली. पण या दोघांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : सिडनीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs Australia) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी पुन्हा एकदा भारताला चांगली सुरूवात करून दिली. पण या दोघांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 98-2 एवढा झाला आहे. चेतेश्वर पुजारा 9 रनवर तर अजिंक्य रहाणे 4 रनवर खेळत आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या ओपनिंग जोडीने भारताला 71 रनची पार्टनरशीप करून दिली. यानंतर शुभमन गिल 31 रनवर तर रोहित शर्मा 52 रन करून आऊट झाले. शुभमन गिलला हेजलवूडने तर रोहित शर्माला पॅट कमिन्सने आऊट केलं. त्याआधी ऑस्ट्रेलियाने भारताला (India vs Australia) 407 रनचं आव्हान दिलं. 321-6 या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी चहानंतर आपला डाव घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला  406 रनची आघाडी मिळाली. कॅमरून ग्रीनने 84 रन, तर पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने 81 रन केले. मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) 73 रन करून आऊट झाला. चौथ्या दिवसाची सुरूवात ऑस्ट्रेलियाने 103-2 अशी केली होती. आर.अश्विन आणि नवदीप सैनी यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 244 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 94 रनची आघाडी मिळाली होती. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथचं शतक, तसंच पुकोवस्की आणि लाबुशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर 338 रनपर्यंत मजल मारली होती.

First published: