मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : शेवटच्या दोन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये मोठे बदल, या खेळाडूला डच्चू

IND vs AUS : शेवटच्या दोन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये मोठे बदल, या खेळाडूला डच्चू

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) त्यांच्या टीममध्ये बदल केले आहेत.

    मेलबर्न, 30 डिसेंबर : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) त्यांच्या टीममध्ये बदल केले आहेत. फॉर्ममध्ये नसलेल्या जो बर्न्स (Joe Burns) याला डच्चू देण्यात आला आहे. या सीरिजमध्ये बर्न्स याने 8, 51 नाबाद, ० आणि 4 रनची खेळी केली होती. तर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि विल पुकोवस्की (Will Pucovski) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये वॉर्नरला दुखापत झाली होती, तर सराव सामन्यादरम्यान विल पुकोवस्की याच्या डोक्याला दुखापत झाली होती. यावषी नवव्यांदा पुकोवस्की याच्या डोक्याला बॉल लागला होता. सीन अबॉटदेखील पोटरीच्या दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. जो बर्न्स याच्याऐवजी डेव्हिड वॉर्नर अंतिम-11 मध्ये खेळेल, पण पुकोवस्कीचं पदार्पण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला टीममध्ये बदल करावा लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत दुसरा सामना 8 विकेटने जिंकला. सीरिजची तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम टीम पेन (कर्णधार), सीन एबॉट, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉस हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, मॉईसेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल नासेर, जेम्स पॅटिनसन, विल पुकोवस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या