आॅस्ट्रेलियाचा मॅक्सवेल'डन' विजय, भारताने मालिका गमावली

मॅक्सवेलच्या तुफान शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियााने दुसरा टी-20 सामनाही खिश्यात घातला.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 06:10 PM IST

आॅस्ट्रेलियाचा मॅक्सवेल'डन' विजय, भारताने मालिका गमावली

27 फेब्रुवारी : मॅक्सवेलच्या तुफान शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियााने दुसरा टी-20 सामनाही खिश्यात घातला. आॅस्ट्रेलियाने भारताचा 7 गडी राखून आपल्याच मायभूमीत पराभव केला.

आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत 190 धावांचा डोंगर उभा केला.  विराट कोहलीने शानदार 38 चेंडूत दोन चौकार आणि 6 षटकार लगावून 72 धावा केल्या होत्या. तर केएल राहुलने 47  आणि धोनीने 23 चेंडूत चौकार षटकार लगावत 40 धावा केल्यात. या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाला 191 धावांचे आव्हान दिले होते.191 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आॅस्ट्रेलियन संघाने जशाच तसे उत्तर दिले. सलामीची जोडी डार्सी शॉर्ट 6 चौकार लगावत 40 धावा केल्या. तर कर्णधार  एरॉन फिंच 8 आणि मार्कस स्टोइनिस 7 धावा करून झटपट बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गेल मॅक्सवेलने 9 षटकार आणि 7 चौकार लगावत 52 चेंडूत शतक झळकावले. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मॅक्सवेलने चौकार लगावून टीमला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने 55 चेंडूत 113 नाबाद धावा केल्यात. भारताकडून विजय शंकरने दोन तर सिद्धार्थ कौलने १ गडी बाद केला. आॅस्ट्रेलियाने 2-० ने आघाडी घेतली आहे.

Loading...

याआधी विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यातही आॅस्ट्रेलिया टाॅस का बाॅस ठरला होता. आॅस्ट्रेलियाने तेव्हाही प्रथम गोलंदाजी करून भारताचा पराभव केला होता. भारताने निर्धारित 20 षटकात 126 धावा केल्या होत्या. 127 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आॅस्ट्रेलियन संघाने सावध सुरूवात केली. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्याच षटकार कर्णधार एरॉन फिंच आणि मार्कस स्टोइनिस झटपट बाद झाले. त्यानंतर आलेल्या ग्लेन मैक्सवेल आणि पीटर हैंड्सकॉम्बने टीमची कमान सांभाळली. मॅक्सवेलने 43 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार लगावत टीमच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. पण, मॅक्सवेल 56 तर स्टोइनिस 13 धावा करून बाद झाल्यानंतर भारताची विजयाची आशा पल्लवीत झाली. परंतु, अखेरच्या चेंडूपर्यंत आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी झुंज दिली आणि विजय मिळवला.


===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2019 10:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...