Home /News /sport /

IND vs AUS : सिडनी टेस्टवर कोरोनाचं संकट, या मैदानात तिसरी टेस्ट!

IND vs AUS : सिडनी टेस्टवर कोरोनाचं संकट, या मैदानात तिसरी टेस्ट!

सिडनी (Sydney)मध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) मेलबर्नमध्येच भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅचचं आयोजन करू शकते.

    मेलबर्न, 22 डिसेंबर : सिडनी (Sydney)मध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) मेलबर्नमध्येच भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅचचं आयोजन करू शकते. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्ट सुरू होणार आहे. तर तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये आहे. सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे इकडे 23 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मेलबर्नमध्येच तिसऱ्या टेस्ट मॅचचं आयोजन व्हायची शक्यता आहे. भारतीय टीमला या या संभाव्य बदलाबाबत सांगण्यात आलं आहे. लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते. सिडनीमध्ये कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळल्यानंतर काही कॉमेंटेटर आणि अन्य कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारीच सिडनीमध्ये टेस्ट होईल, असं स्पष्ट केलं होतं, पण मागच्या 24 तासांमध्ये गोष्टी बदलल्या. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सिडनीमध्ये टेस्ट खेळवणं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुरक्षित वाट नाही. न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या बातमीमध्ये बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, 'मेलबर्न हा सध्या सुरक्षित पर्याय आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटत आहे, कारण खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा याला प्राधान्य आहे. ते बीसीसीआयसोबत नियमित संपर्कात आहेत आणि लवकरच टेस्ट मॅचसाठीचं ठिकाण ठरवलं जाईल.' कोरोनामुळे वॉर्नर-एबॉट आधीच मेलबर्नला सिडनीमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सीन एबॉट (Sean Abott) आधीच मेलबर्नला रवाना झाले. भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये वॉर्नरला दुखापत झाली होती. सिडनीमध्ये वॉर्नरच्या दुखापतीवर उपचार सुरू होते. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे व्हिक्टोरिया सिडनीमधून येणाऱ्या लोकांसाठी सीमा बंद केल्या जाऊ शकतात, त्यामुळे वॉर्नर आणि सीन एबॉट शनिवारीच मेलबर्नमध्ये पोहोचले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या