IND vs AUS : धोनी नसल्यामुळे जडेजा-चहलच्या बॉलिंगमध्ये धार उरली नाही!

IND vs AUS : धोनी नसल्यामुळे जडेजा-चहलच्या बॉलिंगमध्ये धार उरली नाही!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे स्पिनर (India vs Australia) संघर्ष करताना दिसत आहेत. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना विकेट मिळवण्यात अडचणी आल्या.

  • Share this:

सिडनी, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे स्पिनर (India vs Australia) संघर्ष करताना दिसत आहेत. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना विकेट मिळवण्यात अडचणी आल्या. वनडे सीरिजमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला, याचं मुख्य कारण बॉलरची निराशाजनक कामगिरी हे राहिलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पिनरच्या अपयशाचं कारण एमएस धोनी (MS Dhoni) टीममध्ये नसणं हे आहे, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू किरण मोरे (Kiran More) यांनी दिली आहे.

एमएस धोनी याने या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी नेहमीच स्टम्पमागून स्पिनरना मार्गदर्शन करायचा, याचा फायदा स्पिनरना मोठ्या प्रमाणावर व्हायचा. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनीही धोनीची आम्हाला बरीच मदत होते, असं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

'धोनी नेहमी बॉलरना कोणत्या लाईनवर बॉल टाकायचा याचे सल्ले द्यायचा, तेही हिंदीमध्ये. आता स्टम्पच्या मागे धोनी नाही. त्यामुळे भारतीय स्पिनर्स संघर्ष करत आहेत. कुलदीप आणि जडेजा या दोघांच्याही बॉलिंगमध्ये आता तशी धार दिसत नाही,' असं किरण मोरे महिला टीमचे प्रशिक्षक डबल्यूव्ही रमन यांच्याशी बोलताना म्हणाले.

'10-12 वर्ष धोनीने हे केलं, ज्यामुळे विराट सीमारेषेवर फिल्डिंगला उभा राहायचा, आता बॉलरसोबत बोलण्यासाठी विराटने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर किंवा मिड ऑफवर फिल्डिंग करावी,' असा सल्लाही किरण मोरे यांनी दिला आहे.

वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी भारतीय स्पिनरची धुलाई केली. एक मॅच खेळणाऱ्या कुलदीपला फक्त एकच विकेट घेता आली. तर जडेजाने 3 मॅचमध्ये 180 रन देऊन एकच विकेट घेतली. चहलने दोन वनडे मॅचमध्ये 160 रन दिले आणि एक विकेट काढली. तिसऱ्या वनडेमध्ये चहलला काढून विराटने कुलदीपला संधी दिली होती.

Published by: Shreyas
First published: December 8, 2020, 6:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या