मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिस्बेन टेस्टवर संकट, सिडनीतच सीरिज संपणार?

IND vs AUS : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिस्बेन टेस्टवर संकट, सिडनीतच सीरिज संपणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली चौथी टेस्ट मॅच ब्रिस्बेनमध्ये होणार का नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ब्रिस्बेनमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे, तसंच टीम इंडियाच्या खेळाडूंना ब्रिस्बेनमध्ये क्वारंटाईन नियम पाळावे लागणार आहेत, त्यातच आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिस्बेन टेस्टपुढे संकट उभं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली चौथी टेस्ट मॅच ब्रिस्बेनमध्ये होणार का नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ब्रिस्बेनमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे, तसंच टीम इंडियाच्या खेळाडूंना ब्रिस्बेनमध्ये क्वारंटाईन नियम पाळावे लागणार आहेत, त्यातच आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिस्बेन टेस्टपुढे संकट उभं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारताची इंग्लंडविरुद्धची सीरिज प्रभावित होईल, अशी भीती बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे व्यक्त केली आहे. बीसीसीआयची चिंता फक्त ब्रिस्बेनचा कठोर क्वारंटाईन नियम नाही, तर कोरोनाचा नवा स्ट्रेनही आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितलं, की सध्या ऑस्ट्रेलियातून भारतात जायला कोणतीही बंदी नाही, पण कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे या नियमात बदल होऊ शकतो, अशी भीती बीसीसीआयला आहे. सध्या ब्रिटनहून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर 7 दिवस क्वारंटाईन आणि त्यानंतरचा एक आठवडा घरात क्वारंटाईन व्हावं लागत आहे. जर हा नियम टीम इंडियासाठीही लागू झाला, तर भारत-इंग्लंड सीरिज प्रभावित होऊ शकते.

ब्रिस्बेन टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया 19 तारखेला भारतात येण्यासाठी निघेल. इंग्लंड सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होईल. त्यामुळे बीसीसीआय सिडनी टेस्ट झाल्यानंतरच टीम इंडियाने भारतात परतावं, असा विचार करत आहे, त्यामुळे ही सीरिज तीन टेस्ट मॅचनंतरच संपू शकते.

ब्रिस्बेनचे कडक नियम

ब्रिस्बेनमधल्या क्वारंटाईनच्या कडक नियमांमुळेही भारतीय टीम चिंतेत आहे. ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाला हॉटेलच्या बाहेर जायचीही परवानगी नाही. पण बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला खेळाडू यासाठी तयार नसल्याचं सांगितलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया चौथ्या टेस्टला दुसरीकडे आयोजित करू शकत नाही, कारण बिग बॅश लीगच्या मॅच दुसऱ्या मैदानात सुरू आहेत.

First published: