मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : इतिहासाची पुनरावृत्ती! 35 वर्षानंतर भारताने पुन्हा केलं हे रेकॉर्ड

IND vs AUS : इतिहासाची पुनरावृत्ती! 35 वर्षानंतर भारताने पुन्हा केलं हे रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताला तब्बल 131 रनची मोठी आघाडी मिळाली आहे.

  • Published by:  Shreyas

मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताला तब्बल 131 रनची मोठी आघाडी मिळाली आहे. याआधी ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने 53 रनची आघाडी घेतली होती. 1985-86 नंतर पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियात सीरिजच्या पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये आघाडी करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय बॉलरनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट केला. यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) चं शतक आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) च्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर 131 रनची आघाडी मिळवली.

याआधी ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने 53 रनची आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला होता. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा सगळ्यात कमी स्कोअर होता. डे-नाईट टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताची इनिंग फक्त 90 मिनिटांमध्ये संपुष्टात आली.

इतिहासाची पुनरावृत्ती

1985-86 सालीही पहिले ऍडलेड आणि मग मेलबर्नमध्येच भारताने आघाडी घेतली होती. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 381 रननंतर भारताने 520 रन केले. यानंतर मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 262 रननंतर भारताला 445 रन करता आले. या दोन्ही टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या होत्या.

सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने 4 विकेट गमावून 600 रन केले होते, यानंतर ऑस्ट्रेलियाचा 396 रनवर ऑल आऊट झाला.

मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 326 रन केले.

First published: