IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पंत बनला 'धोनी', अश्विनला मिळवून दिली विकेट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारतीय (India vs Australia) बॉलरनी गाजवला. ऋषभ पंत (Rishabh Pant) याने या मॅचमध्ये अश्विन (R Ashwin) याला सल्ला दिला, ज्यानंतर भारताला विकेट मिळाली. यानंतर अनेकांनी पंत याची तुलना एमएस धोनी (MS Dhoni) याच्याशी केली.
मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारतीय (India vs Australia) बॉलरनी गाजवला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट झाला. ऍडलेड टेस्टमध्ये 8 विकेटने झालेल्या दारूण पराभवानंतर भारताने बॉक्सिंग डे टेस्टमध्ये धमाकेदार पुनरागमन केलं. बुमराहला सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, तर अश्विनला 3, मोहम्मद सिराजला 2 विकेट आणि रविंद्र जडेजाने एक विकेट घेतली. या मॅचमध्ये भारतीय टीमने विकेट कीपर म्हणून ऋद्धीमान साहा याच्याऐवजी ऋषभ पंत (Rishabh Pant) याला संधी दिली होती.
ऋषभ पंत याने या मॅचमध्ये त्याच्या टीकाकारांची बोलती बंद केली. स्टम्प मायक्रोफोनमध्ये ऋषभ पंत आर. अश्विनला सल्ला देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पंतच्या या सल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ओपनर मॅथ्यू वेड आऊट झाला. 'बॉल आतमध्येच ठेव, तो मारण्याचा प्रयत्न करेल,' असं पंत म्हणाला. यानंतर पुढच्याच बॉलला वेडने बॉल हवेत मारला.
Translation: Keep it inside(stumps), he will try to hit!
मॅथ्यू वेडचा कॅच पकडण्यासाठी रविंद्र जडेजा आणि शुभमन गिल दोघंही धावले. या दोघांची कॅच पकडताना टक्कर झाली, पण जडेजाने कॅच सोडला नाही आणि वेडला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. वेडने 39 बॉलमध्ये 30 रन केले होते.
वेडच्या विकेटनंतर सोशल मीडियावर ऋषभ पंत याची तुलना एमएस धोनी (MS Dhoni) याच्याशी करण्यात आली. ज्यापद्धतीने धोनी बॉलरना सूचना द्यायचा, तसंच आज ऋषभ पंतनेही केलं आणि यामध्ये टीमला यश आलं.