Home /News /sport /

IND vs AUS : अश्विनने मोडला वकार युनूसचा विक्रम, आता माल्कम मार्शल रडारवर

IND vs AUS : अश्विनने मोडला वकार युनूसचा विक्रम, आता माल्कम मार्शल रडारवर

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने दिमाखदार कामगिरी केली आहे. या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आर.अश्विन (R.Ashwin) याने मार्नस लाबुशेनची विकेट घेतली. याचसोबत अश्विनने पाकिस्तानी दिग्गज बॉलर वकार युनूस (Waqar Younis) याचा रेकॉर्ड मोडला आहे.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 28 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने दिमाखदार कामगिरी केली आहे. या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आर.अश्विन (R.Ashwin) याने मार्नस लाबुशेनची विकेट घेतली. याचसोबत अश्विनने पाकिस्तानी दिग्गज बॉलर वकार युनूस (Waqar Younis) याचा रेकॉर्ड मोडला आहे. आता अश्विनच्या निशाण्यावर वेस्ट इंडिजचे माजी फास्ट बॉलर माल्कम मार्शल यांचं रेकॉर्ड आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी तीन विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट केला होता, यानंतर भारताने 326 रन केले. भारताला पहिल्या इनिंगमध्ये 131 रनची आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने लाबुशेनला आऊट केलं. अजिंक्य रहाणेने लाबुशेनचा कॅच पकडला. अश्विनने लाबुशेनला आऊट करताच त्याने वकार युनूसला मागे टाकलं. वकारने टेस्ट क्रिकेटमध्ये 373 विकेट घेतल्या आहेत. अश्विनची ही 73 वी टेस्ट मॅच आहे, तर वकारने 87 टेस्ट मॅचमध्ये 373 विकेट घेतल्या होत्या. अश्विनच्या निशाण्यावर आता वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शल यांचं रेकॉर्ड आहे. मार्शल यांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 376 विकेट आहेत, मार्शल यांनी 81 टेस्टमध्ये एवढ्या विकेट घेतल्या. मेलबर्न टेस्टमध्ये खेळत असलेला दुसरा ऑफ स्पिनर नॅथन लायन याने टेस्टमध्ये 394 विकेट घेतल्या. अश्विन हा टेस्ट क्रिकेटमधला भारताचा चौथा यशस्वी बॉलर आहे. अनिल कुंबळे (619 विकेट), कपिल देव (434 विकेट), हरभजन सिंग (417 विकेट) यांनी अश्विनपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. मुरलीधरन याने टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन 20 व्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या