मेलबर्न, 28 डिसेंबर : मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मॅथ्यू वेड (Mathew Wade) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात वादावादी झाली. मॅथ्यू वेडने ऋषभ पंतच्या वजनावर वक्तव्य केलं, यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने वेडला प्रत्युत्तर दिलं.
ऋषभ पंत खेळपट्टीच्या मागून विकेट कीपिंग करताना वारंवार मॅथ्यू वेडला बोलून त्रास देत होता. त्यानंतर मॅथ्यू वेडचा संयम सुटला आणि त्याने पंतवर निशाणा साधला. तुझं वजन 25 किलो जास्त आहे, अशी टिप्पणी मॅथ्यू वेडने केली. पण यामुळे पंतला काहीच फरक पडला नाही, उलट मॅथ्यू वेडचं लक्ष विचलित झालं आणि बुमराहने टाकलेला बाऊन्सर त्याच्या हेल्मेटला लागला. यानंतर ऑस्ट्रेलियन टीमचा फिजियो मैदानात आला. फिजियोने वेडची कनकशन टेस्ट घेतली, यामध्ये तो पास झाला.
They are not going to back off !!! Wade vs Pant #INDvAUS #AUSvIND #BoxingDayTest #2ndTest pic.twitter.com/Xq0g2I1IzU LIVE SCORE: https://t.co/e0ZU4qkWNg
— CricketNext (@cricketnext) December 28, 2020
Wade vs Pant - Part II#INDvAUS #AUSvIND #BoxingDayTest #2ndTest pic.twitter.com/Oxk6hgwYmy LIVE SCORE: https://t.co/e0ZU4qkWNg
— CricketNext (@cricketnext) December 28, 2020
Thankfully Matthew Wade has passed the concussion test, has a new helmet and is right to continue after this nasty blow #AUSvIND pic.twitter.com/lN0StnlSdt
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2020
चहाच्या विश्रांतीवेळी मॅथ्यू वेडला ऋषभ पंतबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'तो नेहमीच हसत असतो, त्याला काय मस्करी दिसते माहिती नाही. मला वाटतं त्याला माझ्या बॅटिंगवर हसायला येत असेल,' अशी प्रतिक्रिया मॅथ्यू वेडने दिली.
20 वेळा वेडच्या डोक्याला लागला बॉल
2020 या एका वर्षात मॅथ्यू वेडच्या डोक्याला 20 वेळा बॉल लागला. मॅथ्यू वेडपेक्षा जास्त 21 वेळा इंग्लंडचा ओपनर रॉरी बर्न्स याच्या हेल्मेटला बॉल लागला. हेल्मेटमुळे मॅथ्यू वेड थोडक्यात बचावला, नाहीतर त्याला गंभीर दुखापत झाली असती. रविंद्र जडेजाने वेडला LBW केलं. 137 बॉलमध्ये 40 रन करून वेड आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.