Home /News /sport /

IND vs AUS : विराटच्या 'आवडत्या' खेळाडूला अजिंक्यच्या टीममध्ये संधी नाही!

IND vs AUS : विराटच्या 'आवडत्या' खेळाडूला अजिंक्यच्या टीममध्ये संधी नाही!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया (India vs Australia) ची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणेने दुसऱ्या टेस्टसाठीच्या टीममध्ये चार बदल केले आहेत.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 25 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया (India vs Australia) ची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणेने दुसऱ्या टेस्टसाठीच्या टीममध्ये चार बदल केले आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना टीममध्ये संधी देण्यात आली. तर पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना डच्चू देण्यात आला. विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला आणि मोहम्मद शमीला पहिल्या टेस्टमध्ये दुखापत झाल्यामुळे तो उरलेल्या सीरिजला मुकणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे केएल राहुल (KL Rahul) याला संधी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. विराट कोहलीचा आवडता खेळाडू असलेल्या केएल राहुलने यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आयपीएलमध्येही तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजसाठी निवड झाली, पण अजूनतरी त्याला या सीरिजमध्ये संधी मिळालेली नाही. केएल राहुल याने वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली असली तरी टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र त्याला सातत्य दाखवता आलं नाही. वनडेमध्ये राहुलने 45.93 च्या सरासरीने, टी-20 मध्ये 44.06 च्या सरासरीने तर टेस्ट क्रिकेटमध्ये 34.59 च्या सरासरीने रन केले आहेत. राहुलच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 5, वनडेमध्ये 4 तर टी-20 क्रिकेटमध्ये दोन शतकं आहेत. 'टॅटू-हेयरस्टाईल असणाऱ्यांना संधी' भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या टीम निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी फंकी हेयरस्टाईल आणि टॅटू असल्यास टीममध्ये निवड होते, असा टोला गावसकर यांनी लगावला होता. भारतीय टीम मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या